ग्रंथालय पुरस्कारांचे सोमवारी वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:34 AM2021-01-17T04:34:23+5:302021-01-17T04:34:23+5:30
सातारा : अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्यावतीने देण्यात येणार्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतीप्रित्यर्थ ग्रंथालय पुरस्कारांचे वितरण प्रतापसिंह महाराज ...
सातारा : अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्यावतीने देण्यात येणार्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतीप्रित्यर्थ ग्रंथालय पुरस्कारांचे वितरण प्रतापसिंह महाराज जयंतीदिनी सोमवार, १८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पाठक हॉल, राजवाडा येथे होणार असल्याची माहिती अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचे संस्थापक, सातारा नगरपरिषदेचे माजी सभापती रवींद्र भारती-झुटिंग यांनी दिली. पुरस्काराचे हे पाचवे वर्षे आहे.
या वर्षीचा उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार ज्ञानांकुर वाचनालय, दिवशी बु.॥ ता. पाटण, जि. सातारा यांना, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार अरुण रामचंद्र माने रहिमतपूर यांना, उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार जास्मिन शकील शिकलगार, नागठाणे यांना तर उत्कृष्ट ग्रंथ वाचक पुरस्कार उर्विबुक क्लब, सातारा यांना, कॉ. किरण माने माजी अध्यक्ष सातारा जिल्हा राष्ट्रसेवा दल, यांच्या हस्ते व सातारा नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा सभापती सीता राम हादगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ग्रंथालयाचे पदाधिकारी व साहित्यिकांच्या उपस्थित देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष शशीभूषण जाधव, कार्याध्यक्ष साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी केले आहे.