शेतकरी संघटनेची सोमवारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:42 AM2021-09-25T04:42:49+5:302021-09-25T04:42:49+5:30
कुडाळ : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि ऊस उत्पादकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी ...
कुडाळ : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि ऊस उत्पादकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (दि. २७) दुपारी एक वाजता कुडाळ येथे आयोजित केली आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कमलाकर भोसले यांनी दिली आहे.
या बैठकीसाठी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय नेते व स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी संघटना महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सीमाताई नरोडे, युवा आघाडीचे अध्यक्ष सुनील गोटकिले, विभागप्रमुख अशोकराव जाधव उपस्थित राहणार आहेत.
भोसले म्हणाले, ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस बिल, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, महावितरणची बोगस बिले देऊन शेतकऱ्यांची केलेली फसवणूक, खासगी सावकारी व विकास सेवा सोसायटीने शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस कर्जाची चाललेली जप्ती व वसुली थांबविणे तसेच दुधाची दरवाढ व लबाड व्यापाऱ्यांची कमी दराने होत असलेली सोयाबीन खरेदी अशा विविध शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.’