खरीपासाठी मान्सूनचे आगमन महत्वाचे-- सुनील बोरकर , चर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 09:45 PM2019-06-01T21:45:25+5:302019-06-01T22:00:07+5:30
मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावतो. या पवासावरच खरीप हंगामाचे चित्र अवलंबून असते. चांगल्या पावसाची आशा आहे. - सुनील बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा --संडे स्पेशल मुलाखत
नितीन काळेल ।
महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. त्यापूर्वी वळवाचा व मान्सून पूर्व पाऊस होतो. मात्र, यंदा अद्यापही वळवाचा एकही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंता निर्माण होऊ शकते. पण, मान्सून एकदा सुरू झाला की शेतकºयांची चिंता दूर होण्यास मदत होईल. कृषी विभागानेही खरीप हंगामाची पूर्ण तयारी केलीय. शेतकºयांना बी बियाणे, खते तसेच इतर कोठेही अडचण येणार नाही हे पाहिले आहे.
प्रश्न : जिल्ह्यातील खरीप हंगामाची स्थिती काय राहील ?
उत्तर : जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५२ हजार हेक्टर राहणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सूनचे आगमन काही दिवस लांबणार आहे. पण, शेतकºयांनी चिंता करण्याचे कारण नाही. पाऊस जवळपास १०० टक्के पडण्याची शक्यता आहे. मान्सून आठ-दहा दिवस लांबल्याने काही फरक पडणार नाही.
प्रश्न : बीयाणे आणि खतांचे नियोजन केले आहे का ?
उत्तर : जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वत्रच घेण्यात येतो. पूर्व भागात बाजरीची पेरणी अधिक होते. त्यासाठी बी- बियाण्यांची उपलब्धता आहे. ४८ हजार ५९२ क्विंटल बियाणे आणि १ लाख ३० हजार मेट्रीक टन खताची उपलब्धता लागणार आहे. बियाणे व खताचीही कमतरता भासणार नाही.
प्रश्न : खरीपासाठी विशेष काय उपाययोजना आहेत ?
उत्तर : जिल्ह्यातील शेतकºयांच्यादृष्टीने खरीप हंगाम महत्वाचा असतो. शेती उत्पादन अधिक कसे वाढेल हे पाहिले जाईल. त्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे.
आढावा बैठका
खरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्ह्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी आढावा बैठका झाल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या उपस्थिततही आढावा घेण्यात आलाय. कृषी सेवक केंद्र चालकांचीही कार्यशाळा घेण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्यादृष्टीने पूर्णपणे नियोजन झालेले आहे.
गुणवत्तापूर्ण बी
खरीप हंगामात शेतकºयांना गुणवत्तापूर्ण बियाणे मिळतील याकडे कृषी विभागाचा कटाक्ष राहील. त्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके बियाण्यांची तपासणी करणार आहेत.
सोयाबीन क्षेत्र
जिल्ह्यात खरीप हंगामातील ज्वारीचे क्षेत्र कमी होत आहे. त्या तुलनेत सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊ लागलीय. सोयाबीन पीक शेतकºयांना परवडत असल्याचे दिसते.