मान्सून येतोय रे.. - पाखरंही देतात पावसाची चाहूल .आवाज, हालचालींतून संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:56 AM2019-05-22T00:56:46+5:302019-05-22T00:57:12+5:30

उच्चांकी पारा अनुभवणाऱ्या सातारकरांना आता पावसाच्या सरी बरसण्याची प्रतीक्षा आहे. नैसर्गिक अधिवासात राहणाºया आणि निसर्गात होणाºया छोट्या छोट्या बदलाचा सुक्ष्म परिणाम करून घेणारे अनेक पशुपक्षी आढळतात. त्याचप्रमाणे पावसाची

Monsoon is raining .. - Shakespeare also offers a rainstorm .Voice, signals from movement | मान्सून येतोय रे.. - पाखरंही देतात पावसाची चाहूल .आवाज, हालचालींतून संकेत

मान्सून येतोय रे.. - पाखरंही देतात पावसाची चाहूल .आवाज, हालचालींतून संकेत

Next
ठळक मुद्देझाडं, वेली, कीटकही ‘वर्षादूत’

प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : उच्चांकी पारा अनुभवणाऱ्या सातारकरांना आता पावसाच्या सरी बरसण्याची प्रतीक्षा आहे. नैसर्गिक अधिवासात राहणाºया आणि निसर्गात होणाºया छोट्या छोट्या बदलाचा सुक्ष्म परिणाम करून घेणारे अनेक पशुपक्षी आढळतात. त्याचप्रमाणे पावसाची चाहूल सांगणारे आणि खात्रीने त्याची सूचना देणारे पक्षी ‘वर्षादूत’ म्हणून ओळखले जातात.

सातारा जिल्ह्याला नैसर्गिक संपन्नता आहे. या संपन्नतेमुळे येथील पशुु आणि पक्षी यांचे निरीक्षण करणाºया अभ्यासकांनी काही निरीक्षणे नोंदविली आहेत. मराठवाड्यात प्रचंड संख्येने आढळणाºया गोडंबा- म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत मानले जातात. खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्यावर्षी पाऊस कमी पडतो. कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाºयाचे संकेत देतो.
बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो. आपण वेली पाहतो. या वेलींचे तंतू अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे, असे प्राणी व पक्षी तज्ज्ञ सांगतात.

कावळा कोठे घरटे बांधतो हे महत्त्वाचे
कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभूळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्यावर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार.

पावशा पक्षी
चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाºया आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करीत.

खेकडे : तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाºया खेकड्यांवरून शेतकºयाला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकड्यांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. परंतु, त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा कोणी विचारही करीत नाही.

तित्तीर पक्षी : माळरानावर, शेतांवर काळ्या पांढºया अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोडान केको.. कोडान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच पाऊस येणार असे खुशाल समजावे. मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.

वादळी पक्षी : पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाºयाच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पाखरू किनाºयाच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे धोक्याची पूर्वसूचनाच असते. अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार.

काळ्या मुंग्या : हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.

चातक पक्षी : पावसाळा आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही.

वाळवी : जंगलात झाडे पोखरणाºया वाळवी/ उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु, पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाट्यात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढ्या तयार होतात. त्या वारुळे तयार करतात.

Web Title: Monsoon is raining .. - Shakespeare also offers a rainstorm .Voice, signals from movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.