फलटणमध्ये शंभरहून अधिक गायींची कत्तल,पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 13:11 IST2018-05-16T13:11:39+5:302018-05-16T13:11:39+5:30
मंगळवार पेठ परिसरात असलेल्या कुरेशी नगरात शंभरहून अधिक गार्इंची कत्तल करण्यात आल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. फलटण पोलिसांनी कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात मांससाठा आढळून आला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना एकाला ताब्यात घेतले आहे.

फलटणमध्ये शंभरहून अधिक गायींची कत्तल,पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा
फलटण : मंगळवार पेठ परिसरात असलेल्या कुरेशी नगरात शंभरहून अधिक गार्इंची कत्तल करण्यात आल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. फलटण पोलिसांनी कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात मांससाठा आढळून आला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना एकाला ताब्यात घेतले आहे.
राज्यात गोवंश हत्या बंद आहे. असे असतानाही फलटणमधील कुरेशी नगरात अनधिकृतपणे जुन्या कत्तलखान्यात गाई आणि तत्सम जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मुंबई येथील मानद पशु कल्याण अधिकारी येतेंद्र कांतीलाल जैन यांनी फलटण पोलिसांना दिली होती.
त्यानुसार शहर पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिंगटे यांच्या पथकाने बुधवारी पहाटे पावणे एकच्या सुमारास
येथील कुरेशी नगरीतील जुन्या कत्तलखान्यावर छापा टाकला. यावेळी गोवंशाची कत्तल करण्यात आलेली सुमारे शंभर मुंडकी व मांस या ठिकाणी आढळून आले.
दरम्यान, पोलिसांची चाहंूल लागताच घटनास्थळावरील दोघांनी धारदार शस्त्रासह अंधारातून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून इम्तियाज मेहबूब बेपरी याला ताब्यात घेतले.
दरम्यान, पळून गेलेल्या एकाचा शोध पोलिस घेत आहेत. याप्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सावंत करीत आहेत.