रहिमतपूर परिसरात पंधरा दिवसांत दीडशेहून अधिक बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:38 AM2021-04-25T04:38:05+5:302021-04-25T04:38:05+5:30

रहिमतपूर : रहिमतपूर शहरासह परिसरातील गावात गेल्या पंधरा दिवसांत सुमारे दीडशेच्या पुढे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. एकट्या रहिमतपुरात शंभरहून ...

More than 150 affected in 15 days in Rahimatpur area | रहिमतपूर परिसरात पंधरा दिवसांत दीडशेहून अधिक बाधित

रहिमतपूर परिसरात पंधरा दिवसांत दीडशेहून अधिक बाधित

googlenewsNext

रहिमतपूर : रहिमतपूर शहरासह परिसरातील गावात गेल्या पंधरा दिवसांत सुमारे दीडशेच्या पुढे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. एकट्या रहिमतपुरात शंभरहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. रहिमतपुरात कोरोना सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी होत आहे. पालकमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय का, याकडे लक्ष लागले आहे.

रहिमतपूरची लोकसंख्या सुमारे बावीस हजार आहे, तर परिसरातील वाठार किरोली, साप, अपशिंगे, पिंपरी आदी मोठ्या गावांसह लहान गावे व वाड्यावस्त्यांमधील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी दर्जेदार यंत्रणा उपलब्ध असणे गरजेचे आहे. काही दिवसांपासून रहिमतपूर येथे विलगीकरण कक्ष उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, परंतु अद्याप उभारणी झालेली नाही. मात्र, रुग्णवाढीचे प्रमाण प्रचंड गतीनं सुरू असल्याने लोकांच्यात भीती वाढली आहे. बाधितांच्या प्रमाण वाढीबरोबर काही बाधितांचे मृत्यूही झाले आहेत. रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रासह त्याच्या चार उपकेंद्रांना मर्यादा पडत आहे. तिच अवस्था वाठार किरोली प्राथमिक आरोग्य केंद्रासह त्याच्या उपकेंद्रांचीही आहे. सध्या लसीकरण मोहीम सुरू आहे, परंतु लशींचा अल्प पुरवठा होत असल्याने, लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवसभर ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यानंतरही आपल्याला लसीचा नंबर येईल का नाही, याची शाश्वती मिळत नाही. त्यामुळे वादावादीचे प्रकारही घडत आहेत.

कोरेगाव व खटाव तालुक्यांमध्ये लोकप्रतिनिधी कोरोना सेंटर उभारणीसाठी आघाडीवर आहेत. आपल्या मतदारसंघातील रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी शासनाच्या माध्यमातून मिळाली तर ठीक आहे, अन्यथा स्वतः पदरमोड करून कोरोना सेंटर उभारणीवर भर दिला जात आहे.

खटाव तालुक्यातील पडळसारख्या गावात कोरोना सेंटर उभारण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य उपोषणाचा इशारा देऊन कोरोना सेंटर उभे करतो, हे कौतुकास्पद आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन आमदार कोविड सेंटर उभारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, कऱ्हाड-उत्तर विधानसभा मतदार संघात रहिमतपूरसारख्या नगरपरिषदेच्या परिसरात कोरोना सेंटर उभारण्यासाठी कुणी धडपडत असल्याचे दिसून येत नसल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. रहिमतपूरसह परिसरातील गावांतील कोरोनाबाधित रुग्णाला बेड मिळविताना नाकीनऊ येत आहेत.

चौकट

गैरसोय दूर करण्याची गरज

कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना जनतेने आमदार म्हणून पाठिंबा दिला आहे. कोरोना महामारीत लोकप्रतिनिधींकडून योग्य औषधोपचार आणि सोईसुविधा मिळवून द्याव्या, एवढीच माफक अपेक्षा जनतेची आहे. पालकमंत्र्यांनी रहिमतपूर येथे कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय दूर करून दर्जेदार उपचार देण्यासाठी कोरोना सेंटरची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: More than 150 affected in 15 days in Rahimatpur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.