जिल्ह्यातील सर्वाधिक बाधित सातारा तालुक्यात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:35 AM2021-03-15T04:35:51+5:302021-03-15T04:35:51+5:30

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितात पुन्हा वाढ होत असताना आतापर्यंतच्या रुग्ण आणि मृतांच्या आकडेवारीत सातारा आणि कऱ्हाड हे तालुकेच ...

In the most affected Satara taluka of the district ... | जिल्ह्यातील सर्वाधिक बाधित सातारा तालुक्यात...

जिल्ह्यातील सर्वाधिक बाधित सातारा तालुक्यात...

googlenewsNext

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितात पुन्हा वाढ होत असताना आतापर्यंतच्या रुग्ण आणि मृतांच्या आकडेवारीत सातारा आणि कऱ्हाड हे तालुकेच आघाडीवर आहेत. सातारा तालुक्यात आतापर्यंत १४ हजार तर कऱ्हाडमध्ये ११ हजारांवर बाधित आढळले आहेत. तर यानंतर फलटण व कोरेगाव तालुक्यांचा रुग्ण संख्येत क्रमांक लागतो.

जिल्ह्यात एक वर्षापासून कोरोनाची स्थिती आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या उत्तरार्धात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर सतत कोरोना बाधितांची संख्या वाढत गेली. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात तर कोरोनाचा कहर होता. सप्टेंबरमध्येच जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३७ हजारांवर पोहोचला. मात्र, ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून बाधितांचे प्रमाण कमी झाले. त्यानंतर तीन महिने कोरोना स्थिती नियंत्रणात होती. मात्र, फेब्रुवारीपासून कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या वाढू लागली.

जिल्ह्यात फेब्रुवारीत नवीन २ हजार ४९१ बाधित स्पष्ट झाले. तर ३६ जणांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा विस्फोट होत असल्याचेच आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आलेले. कारण, एकाच महिन्यात जिल्ह्यातील ३४ हॉट स्पॉटमध्ये तब्बल ९७५ रुग्ण आढळले होते. आता तर कोरोना बाधितांचा आकडा आणखी वाढत चाललाय.

मार्च महनिा सुरू झाल्यापासून दररोज १००, १५०, २०० च्या पटीत कोरोना बाधितांचा आकडा समोर येत आहे. तसेच कोरोना मृतांचीही संख्या वाढत चालली आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ६१ हजारांच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर मृतांचा आकडा १ हजार ८७१ वर पोहोचलाय. आरोग्य विभागाकडीन नोंदीनुसार सातारा तालुक्यात १४ हजार ४८९ तर कºहाडमध्ये ११ हजार २३९ बाधित स्पष्ट झाले आहेत. यानंतर फलटण तालुक्यात ६ तर कोरेगावमध्ये ५ हजारांवर रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.

चौकट :

तालुकानिहाय रुग्ण आणि मृतांची संख्या

तालुका बाधित मृत

जावळी २९३१ ६७

कऱ्हाड ११२३९ ३४४

खंडाळा ३६४१ ७४

खटाव ४६९१ १५८

कोरेगाव ५२४७ १६६

माण ३३३१ १२२

महाबळेश्वर १४४२ २६

पाटण २३४४ १२०

फलटण ६१४८ १६५

सातारा १४४८९ ४७५

वाई ४३०९ १४७

इतर ७३७ ...

...............................................................

Web Title: In the most affected Satara taluka of the district ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.