काले विभागात सर्वाधिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:39 AM2021-04-21T04:39:06+5:302021-04-21T04:39:06+5:30
आजअखेरच्या आकडेवारीनुसार तालुक्यातील काले आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आले आहेत. वास्तविक, या आरोग्य केंद्रांतर्गत मलकापूर ...
आजअखेरच्या आकडेवारीनुसार तालुक्यातील काले आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आले आहेत. वास्तविक, या आरोग्य केंद्रांतर्गत मलकापूर शहराचाही समावेश आहे. त्यामुळे मृत्यूसह बाधितांचा आकडाही जास्त आहे. त्यापाठोपाठ वडगाव हवेली, येवती आणि रेठरे बुद्रुक विभागातही मृतांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे.
- चौकट
आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरणाला वेग
कऱ्हाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरणाला वेग आला आहे. आरोग्य केंद्र, उपकेंद्रांसह गावोगावी शिबिराच्या माध्यमातून लस देण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. त्याला ग्रामस्थांकडून प्रतिसादही मिळत आहे. ज्या गावांमध्ये रुग्णसंख्या जास्त आहे, अशा गावांवर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केले असून, त्याठिकाणी तातडीने लसीकरण पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
- चौकट
आरोग्य केंद्रनिहाय रुग्ण
आरोग्य केंद्र : रुग्ण : मृत
वडगाव ह. : १०११ : ३०
सदाशिवगड : : ११९२ : २८
सुपने : ६१६ : १९
रेठरे : ६३९ : ३०
काले : २१८७ : ६८
इंदोली : ४४९ : २८
उंब्रज : ८६५ : २२
मसूर : ७२३ : २९
येवती : ७१४ : ३०
कोळे : ६१९ : १७
हेळगाव : १९६ : ६
- चौकट
गावांचा लेखाजोखा
बाधित : १८८
कोरोनामुक्त : ६६
कंटेनमेंटमध्ये : १२१