सर्वाधिक वृक्ष लागवड फलटणमध्ये...

By admin | Published: June 29, 2016 10:32 PM2016-06-29T22:32:30+5:302016-06-29T23:58:40+5:30

जिल्ह्यात पावणे सात लाख झाडे : वाई तालुक्यात सर्वात कमी लागण होणार

Most tree planting phalanan ... | सर्वाधिक वृक्ष लागवड फलटणमध्ये...

सर्वाधिक वृक्ष लागवड फलटणमध्ये...

Next

सातारा : हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दुष्काळी असणाऱ्या फलटण तालुक्यात सर्वाधिक एक लाखाहून अधिक तर माणमध्ये ९८ तर खटावमध्ये ९१ हजारांवर वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. तर संपूर्ण जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. जागतिक तापमानात होणारी वाढ रोखणे व त्यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय बदलाची तीव्रता कमी करणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करावयाच्या उपायोजनांचा भाग म्हणून राज्य शासनाचे विविध विभाग व जनतेच्या सहभागातून वनमहोत्सव कालावधीमध्ये दि. १ जुलै रोजी राज्यात २ कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
विविध यंत्रणांच्या व जनतेच्या सहभागातून हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी १ जुलै रोजी सातारा जिल्ह्यातही ६ लाख ७८ हजार २३० वृक्षलागवड करण्यात येणार आहे. वन विभागामार्फत ५३ साईटस्वर ४ लाख ६० हजार ६००, सामाजिक वनीकरण विभागामार्फत २७ साईटवर ३० हजार तर इतर शासकीय विभाग व स्वयंसेवीसंस्था यांच्यामार्फत ६७० साईटवर १ लाख ८७ हजार ६३० रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
वन विभागामार्फत माण तालुक्यातील ९८ हजार, कऱ्हाड- ४२ हजार ५००, खंडाळा- १० हजार, कोरेगाव- ६६ हजार ८००, पाटण- १५ हजार ७००, फलटण- १ लाख १५ हजार १००, सातारा- १३ हजार ३००, खटाव- ९१ हजार २०० व वाई तालुक्यात ८ हजार या प्रमाणे झाडे लावण्यात येणार आहेत. या वृक्षलागवडीमध्ये सहकारी साखर कारखाने, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, विविध संस्था, पर्यावरण प्रेमी १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्षलागवडीत मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहेत.
जिल्ह्यात वृक्षारोपणाच्या विविध कार्यक्रमातून अधिकाधिक झाडे लावून जिल्ह्यात वृक्षारोपणाची लोकचळवळ निर्माण करण्यात सर्वांनीच सक्रिय होणे काळाची गरज आहे. वृक्ष लागवडीअंतर्गत जिल्ह्यात विविध शासकीय-निमशासकीय यंत्रणांबरोबरच जनतेनेही या वृक्षलागवडीत सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. स्वयंसेवी-सेवाभावी, सहकारी संस्था, मंडळे, विद्यार्थी आणि तरुणांनी सहभागी होणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)


प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे...
वृक्षलागवड मोहिमेत प्रामुख्याने वन आणि सामाजिक वनीकरण विभागाबरोबरच जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच अन्य शाखांतील विद्यार्थ्यांनी किमान पाच ते दहा झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. जनतेने आपल्या घराजवळील, शिवारातील आणि गावातील मोकळ्या जागेत जास्तीत जास्त झाडे लावावीत. महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी पर्यावरणपूरक अशी लोक चळवळ यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Most tree planting phalanan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.