मार्डी परिसरात डोंगराला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:37 AM2021-05-16T04:37:59+5:302021-05-16T04:37:59+5:30

पळशी : माण तालुक्यातील मार्डी हद्दीतील मार्डी-शिंगणापूर मार्गावरील कोंडीपोळ वस्तीनजीकच्या डोंगरावर शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास वणवा लागल्याचे येथील ग्रामस्थांनी ...

Mount the mountain in the Mardi area | मार्डी परिसरात डोंगराला वणवा

मार्डी परिसरात डोंगराला वणवा

Next

पळशी : माण तालुक्यातील मार्डी हद्दीतील मार्डी-शिंगणापूर मार्गावरील कोंडीपोळ वस्तीनजीकच्या डोंगरावर शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास वणवा लागल्याचे येथील ग्रामस्थांनी पाहिले. वेगाने आग पसरत असल्याने येथील युवकांनी वेळ न घालवता आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. प्रसंगावधान दाखवल्याने २५ हेक्टरचा परिसर आगीपासून वाचवण्यात यश आले तर आगीत जवळपास दहा हेक्टर परिसर जळून खाक झाला.

मार्डी-शिंगणापूर मार्गावरील कोंडीपोळ वस्तीनाजीक तीन डोंगर असून, त्यातील एका डोंगराला शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास आग लागली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आग वेगाने दुसऱ्या डोंगराच्या दिशेने पसरत होती. ही आग येथील या तरुणांनी पहिली. वारा जास्त असल्याने आग विझविण्यासाठी तिघांनी वेळ न घालवता डोंगराच्या दिशेने धाव घेत झाडाच्या फांद्यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आग आटोक्यात येत नसल्याने त्यांनी जवळच राहणाऱ्या चंद्रकांत पोळ यांना मोबाइलवरून संपर्क केला व मदत मागितली. तत्काळ पोळ यांनी जवळपासच्या पवारवस्ती, कोंडीपोळ वस्तीवरील मुलांना संपर्क करून बोलावून घेतले तसेच व्हाॅट्सॲपवर मेसेज केले. त्यामुळे अवघ्या काही वेळात मदतीला अनेकजण धावून आले. सुमारे अडीच ते तीन तासांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आले. डोंगर परिसर वाचविल्याने युवकांचे कौतुक होत आहे.

माण तालुक्यात राणंदचा डोंगर, शिंगणापूर नजीकचा डोंगर, मार्डी पळशी हद्दीवरील वन आदी ठिकाणी वणवा लागण्याच्या घटना ताज्या असतानाच मार्डी परिसरात ही डोंगरावर वणवा लागल्याची घटना घडल्याने वन्यप्रेमीतून नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने घटनेची चौकशी करून योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ व वन्यप्रेमीतून होत आहे

चौकट

मोठा अनर्थ टळला..

आग आटोक्यात आली नसती तर जवळच्या दोन्ही मोठ्या डोंगरावर आग पसरली असती व त्यात हजारो झाडे जळाली असती त्याचबरोबर या डोंगरावर काही दिवसांपूर्वी पाणी फाउंडेशनने वृक्षारोपण केले होते. त्या झाडांचेही मोठे नुकसान झाले असते.

फोटो

१५पळशी

माण तालुक्यातील मार्डी शिंगणापूर मार्गावरील कोंडीपोळ वस्तीवरील डोंगराला लागलेली आग येथील युवकांनी विझवली. (छाया : शरद देवकुळे)

Web Title: Mount the mountain in the Mardi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.