बोरगाव पुलावरील वडाचे झाड तातडीने हलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:38 AM2021-03-18T04:38:59+5:302021-03-18T04:38:59+5:30
नागठाणे : नागठाणे परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील काशीळ आणि बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीतील रस्त्यावरील बाजूच्या दोन मोठ्या वडाच्या झाडांना ...
नागठाणे : नागठाणे परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील काशीळ आणि बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीतील रस्त्यावरील बाजूच्या दोन मोठ्या वडाच्या झाडांना मंगळवारी आग लागली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोरगाव येथील पुलावरील पूर्णतः जीर्ण झालेले वडाचे झाड लागलेल्या आगीने जळून खाक झाले. हे वडाचे झाड कोणत्याही क्षणी महामार्गावर पडू शकते. तसेच वडाचे झाड मोठे असल्याने रस्त्यावर प्रवास करणाऱ्या कोणत्याही गाडीवरही पडून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महामार्ग रस्ते विकास महामंडळाने आणि जिल्हा प्रशासनाने तत्काळ याबाबत विचार करून आगीच्या घटनेत बोरगाव पुलावरील जळून खाक झालेले जीर्ण वडाचे झाड पुलावरून तोडून बाजूला काढण्यात यावे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची नुकसानीची आणि जीवितहानीची घटना होऊ नये, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. तर, रस्ते विकास महामंडळाने आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत तत्काळ निर्णय घेऊन बोरगाव पुलावरील वडाचे झाड तेथून तोडून तातडीने हलवावे, अशी स्थानिक नागरिकांकडून आणि प्रवाशांकडून मागणी करण्यात येत आहे.