लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात पोलिसांचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:05 PM2019-03-30T12:05:05+5:302019-03-30T12:06:19+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता शहरातून संचलन केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हे संचलन करण्यात आले.
सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता शहरातून संचलन केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हे संचलन करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यापासून पोलिसांनी खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत. आत्तापर्यंत १५३ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सतर्क झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली संचलन करण्यात आले. हे संचलन शहर पोलीस ठाण्यापासून सुरू करण्यात आले.
पोवई नाक्याला वळसा घालून परत शहर पोलीस ठाण्यात संचलन करण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.