महिला उमेदवाराकडून आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:33 AM2021-01-14T04:33:14+5:302021-01-14T04:33:14+5:30
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. गावातील काही समाजकंटकांनी जातीचा दाखला पळवून नेल्याने छाननीमध्ये उमेदवारी अर्ज ...
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. गावातील काही समाजकंटकांनी जातीचा दाखला पळवून नेल्याने छाननीमध्ये उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. याप्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी चिखली, ता सातारा येथील वंदना खेतरू झुंजार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
चिखली येथील भिवराम अर्जुन शिर्के, जगन्नाथ धोंडिबा शिर्के या दोघांनी माझा इतर मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला उमेदवारी अर्ज बाद होण्यासाठी जाणीवपूर्वक लपवून ठेवला. गावाची निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी संबधितांनी हे कृत्य केल्याचा आरोप वंदना खेतरू यांनी केला. ३१ डिसेंबर रोजी सदर दाखला आम्ही आणून देऊ असे आश्वासन त्यांनी सातारा तालुका पोलिसांना दिले होते मात्र त्यांनी तो दाखला शेवटपर्यंत दिला नसल्याचे खेतरू झुंजार यांनी सांगत या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. वंदना झुंजार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.