“विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला खिंडार पडेल,” धनंजय महाडिक यांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 07:47 PM2022-06-12T19:47:53+5:302022-06-12T19:49:16+5:30

भाजपचे ऋण कधीही न फिटणारे, महाडिक यांनी व्यक्त केल्या भावना.

mp Dhananjay Mahadiks big statement rajya sabha election winning commented on mahavikas aghadi | “विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला खिंडार पडेल,” धनंजय महाडिक यांचं मोठं वक्तव्य

“विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला खिंडार पडेल,” धनंजय महाडिक यांचं मोठं वक्तव्य

Next

इस्लामपूर: “राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेते असताना भाजपने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी देत पक्षाचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे हे ऋण कधीही न फिटणारे आहेत,” अशा शब्दांत धनंजय महाडिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच आता विधानपरिषद निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या रणनीतीने महाविकास आघाडीला मोठे खिंडार पडेल. भाजपचे सर्व सहा उमेदवार निवडून आलेले दिसतील असा विश्वास व्यक्त केला.

पेठनाका येथे स्व.वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर खा. महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “माझी उमेदवारी ही अनपेक्षितपणे पुढे आली. साधरणपणे या निवडणुकीत अनेक दिग्गज इच्छुक असतात.त् यांनाच संधी मिळते असा इतिहास आहे. मात्र भाजपने महाडिक परिवाराच्या गेल्या ३५ वर्षातील समाजकारण आणि राजकारणाची दखल घेत मला संधी देऊन विजयीसुद्धा केले. त्यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी मोठी आहे,” असं ते म्हणाले.

महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महाडीक परिवाराने ३-४ जिल्ह्यात सर्व क्षेत्रात काम उभे केले आहे. भीमराव महाडिक, शामराव महाडिक, पांडुरंग महाडिक, शंकरराव महाडिक आणि नानासाहेब महाडिक यांच्यानंतर आता आमची नवी पिढी त्यांचा समृद्ध वारसा पुढे चालवत आहोत. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याला ताकद देण्याचे काम महाडिक परिवाराने केल्याचे ते म्हणाले.

पक्ष संघटना भक्कम करू
यापुढील काळात पश्चिम महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढवत ती भक्कम करू. पक्षातील जुन्या जाणत्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन घेत नव्या पिढीला पक्षासोबत जोडण्याला प्राधान्य देऊ.स् थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका, महापालिका, नगरपंचायत अशा सर्व निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

फडणवीस, चंद्रकांत पाटलांना श्रेय
“माझ्या विजयाचे सर्व श्रेय माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनाच जाते. पुरेसे संख्याबळ नसतानाही दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना विजयाची हमी देत फडणवीस यांनी आखलेली रणनीती सगळ्या देशाने पाहिली. आता येत्या विधानपरिषद निवडणुकीत गुप्त मतदान होणार आहे.त् यावेळी महाविकास आघाडीतील खदखद आणि उफाळून येईल. या सरकारविषयी जनतेत असंतोष आहेच मात्र त्यांच्या आमदारांमध्येही आहे हे लवकरच स्पष्ट होईल. पक्षाच्या इतर आमदार आणि विशेष करून रुग्णालयात उपचारासाठी दाखल असतानाही लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांनी रुग्णवाहीकेतून येत पक्षावरील आपली निष्ठा दाखवून दिली याचा विशेष अभिमान वाटतो,” असंही महाडिक म्हणाले.

महाडिक परिवाराची एकी..!
या निवडणुकीसाठी माझ्या कुटुंबासह संपूर्ण महाडिक परिवार एकदिलाने झटत होता. राहुल आणि सम्राट महाडिक हे दोघे १५ दिवस मुंबईत तळ ठोकून होते. तेथे थांबून त्यांनीही राज्यातील अनेक आमदारांशी संपर्क साधत माझ्या विजयात योगदान दिले आहे. तसेच पक्षनेते प्रविण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रसाद लाड, चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय यांनीही माझ्या विजयासाठी परीश्रम घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनाही चांगल्या संधी..!
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा संसदेत विद्यार्थी आणि समाजाच्या प्रश्नावर चांगले काम केले आहे. मात्र अपक्ष म्हणून लढण्याची त्यांची भूमिका पक्षीय राजकारणात न पटणारी ठरली. मात्र सध्या त्यांनी समाज बांधणीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे भविष्यात त्यांनाही चांगल्या संधी मिळू शकतात असे महाडिक यांनी स्पष्ट केले.

Web Title: mp Dhananjay Mahadiks big statement rajya sabha election winning commented on mahavikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.