खासदार श्रीनिवास पाटील चचेगावातील शेतकऱ्यांच्या बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:42 AM2021-05-20T04:42:45+5:302021-05-20T04:42:45+5:30
नुकसानग्रस्त केळीच्या बागांची पाहणी पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : चचेगावसह परिसरात चक्रीवादळासह पावसाने चांगलेच थैमान ...
नुकसानग्रस्त केळीच्या बागांची पाहणी
पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : चचेगावसह परिसरात चक्रीवादळासह पावसाने चांगलेच थैमान घातले होते. हातातोंडाशी आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्याने तीन शेतकऱ्यांचे सुमारे वीस लाखांवर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बागांची खासदार श्रीनिवास पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
रविवारी जोरदार चक्रीवादळासह संततधार पावसाने हजेरी लावली होती. यावेळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे चचेगावातील केळीच्या बागांना चांगलाच फटका बसला होता. येथील विलास भीमराव पवार, साहेबराव नाना पवार, हनुमंत दाजी हुलवान यांची सात एकरमध्ये केळीची बाग आहे. पंधरा ते वीस दिवसांत ती केळी विक्रीयोग्य होणार होती. मात्र, रविवारच्या वादळी वाऱ्याने या केळीच्या बागांचे मोठे नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेल्या बागेतील केळीची झाडे वादळी वाऱ्याने मोडून पडली आहेत. या बागा उद्ध्वस्त झाल्यामुळे किमान २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बागांची बुधवारी खासदार श्रीनिवास पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर हजेरी लावत, केळीच्या पडलेल्या बागेत जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहून तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना खासदार पाटील यांनी दिले. यावेळी पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटोल, तहसीलदार अमरदीप वाकडे, मंडल अधिकारी पंडित पाटील, तलाठी महादू राऊत, यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
चौकट
खतांसह कीटकनाशकांच्या वाढत्या किमती चिंतेची बाब
खते, बी-बियाणे, कीटकनाशकांसह शेतीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढून उत्पन्नात घट होते. उत्पादनवाढीसाठी मोकळ्या हाताने कमी किमतीत खते व कीटकनाशके द्यावीत. शीतगृह उभारावीत. शेतकऱ्यांच्या मालाचा उठाव होईल अशा योग्य बाजारपेठा उपलब्ध कराव्यात. योग्य साधने उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे मत खासदार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
कोट
शेतकरी हीच एक मोठी बाजारपेठ आणि शेतकरीच सर्वांत मोठा ग्राहक आहे. अशी दुहेरी भूमिका बजावणाऱ्यांच्या खिशात पैसा आला तरच इतर सर्व उद्योग व्यवसाय चालतात आणि अर्थव्यवस्था हालती राहते. शेतकऱ्यांचे नुकसान झाले की बाजारपेठेचेही नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची गरज आहे.
श्रीनिवास पाटील
खासदार, सातारा
===Photopath===
190521\img-20210519-wa0030.jpg
===Caption===
फोटो कॕप्शन
चचेगांव ता. कराड येथील नुकसानग्रस्त केळीच्या बांगाची खासदार श्रीनिवास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी केली. ( छाया- माणिक डोंगरे)
फोटो कॕप्शन
चचेगांव ता. कराड येथील नुकसानग्रस्त केळीच्या बांगाची खासदार श्रीनिवास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी केली. ( छाया- माणिक डोंगरे)