उदयनराजेंनी बैलगाडीचा कासरा धरत उडवली काॅलर, अन् म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 07:02 PM2022-02-21T19:02:37+5:302022-02-21T19:03:11+5:30

डाेक्यावर फेटा, गळ्यात फड्या अन हातात कासरा अशी खासदार उदयनराजे भोसलेंची होती आदा. यांच्या स्टाईलने शर्यतप्रेमी भलतेच खूश झाले

MP Udayan Raje Bhosale picked up the bullock cart at the venue of the bullock cart race | उदयनराजेंनी बैलगाडीचा कासरा धरत उडवली काॅलर, अन् म्हणाले..

उदयनराजेंनी बैलगाडीचा कासरा धरत उडवली काॅलर, अन् म्हणाले..

Next

सातारा : खासदार उदयनराजे भोसले केव्हा, कधी काय करतील याचा नेम नाही. त्यांची प्रत्येक कृती हटके असते. त्याचाच प्रत्यय सातारा तालुक्यातील देगाव येथे काल, रविवारी आला. येथील बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी खासदार उदयनराजेंनी त्याच्या स्टाईलमध्ये एन्ट्री करत चक्क बैलगाडीचा कासरा हाती घेतला. डाेक्यावर फेटा, गळ्यात फड्या अन हातात कासरा अशी त्यांची आदा हाेती. ढाेल-ताशांच्या गजरात बैलगाडीप्रेमींनी उदयनराजेंचे स्वागत केले.

यावेळी त्यांनी काॅलर उडवून वातावरणात रंगही भरला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलने शर्यतप्रेमी भलतेच खूश झाले. उदयनराजे भाेसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने देगाव येथे उदयनराजे मित्र समूहातर्फे बैलगाडी शर्यतीचे आयाेजन करण्यात आले हाेते. रविवारी सायंकाळी स्वत: उदयनराजे शर्यतीच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी येथील वातावरणाचा नूरच पालटून टाकला.

उपस्थित समर्थक आणि बैलगाडी शर्यत प्रेमींनी एकच जल्लाेष केला. यावेळी राजेंची खास स्टाईल उपस्थितींना पाहिला मिळाली. राजेंनी बैलगाडीवर उभे राहून हातात कासरा घेतला आणि खास आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये काॅलर उडवली.

यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले, ‘मी शेतकरीच आहे. माझ्या इलेक्शनच्या अ‍ॅॅफेडिव्हटमध्ये बघा. या शर्यतीचे मी फक्त निमित्त आहे. याचे श्रेय उदयनराजे मित्र समूहाला आहे. हाॅर्स रेसमध्ये माेठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल हाेते. त्यामुळे तेथे बंदी घातली नाही. शेतकरी बैलांना मुलांप्रमाणे जपतात. त्यामुळे बैलगाडी शर्यती या झाल्या पाहिजेत.’

Web Title: MP Udayan Raje Bhosale picked up the bullock cart at the venue of the bullock cart race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.