खासदार उदयनराजे भोसले कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:46 AM2021-08-18T04:46:22+5:302021-08-18T04:46:22+5:30

सातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ...

MP Udayan Raje Bhosle coronated | खासदार उदयनराजे भोसले कोरोनाबाधित

खासदार उदयनराजे भोसले कोरोनाबाधित

Next

सातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले या कोरोनाबाधित झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे उदयनराजे भोसले अधिवेशन सोडून परतले होते. त्यांची प्रकृती आता बरी आहे. मात्र, दरम्यानच्या काळात उदयनराजे भोसले यांना कोरोना झाल्याचे निदान झाले असून, गेल्या चार दिवसांपासून ते पुण्यात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून, पुढील दोन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचेही त्यांच्या निवटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

उदयनराजे भोसले यांनी कोरोनाच्या काळात दुकाने सुुरू करावीत तसेच लोकांची विनाकारण अडवणूक करू नये, यासाठी भीक मांगो आंदोलन केले होते. कोरोनाच्या काळात प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेलाही त्यांनी विरोध केला होता.

Web Title: MP Udayan Raje Bhosle coronated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.