फडणवीसांच्या हाती सत्ता द्या; मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी माझी- उदयनराजे

By मुकेश चव्हाण | Published: November 29, 2020 02:16 PM2020-11-29T14:16:06+5:302020-11-29T14:25:45+5:30

सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे बोलत होते.

MP Udayan Raje was speaking at a press conference held at Jalmandir Palace in Satara | फडणवीसांच्या हाती सत्ता द्या; मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी माझी- उदयनराजे

फडणवीसांच्या हाती सत्ता द्या; मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी माझी- उदयनराजे

googlenewsNext

सातारा : ‘मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून आहे. आता याला कुबट वास यायला लागलाय. मंडल आयोगावेळी प्रत्येकाला आरक्षण मिळालं. पण, मराठा समाजाचा विसर पडला. त्यावेळच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता. आता आरक्षणाची बंदूक आमच्या खांद्यावर न ठेवता. स्वत:च्या हातात घ्या,’ असा सल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना नाव घेता दिला.  दरम्यान, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रभर नेतृत्व करावं लागेल, असंही यावेळी उदयनराजेंनी सुचित केलं.  

सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे बोलत होते. संपूर्ण पत्रकार परिषदेत उदयनराजेंचा सर्व रोख हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच होता. पण, पत्रकार परिषदेत एकदाही त्यांनी पवार यांचे स्पष्टपणे नाव घेतले नाही.  खासदार उदयनराजे म्हणाले, ‘ मराठा समाजाचा प्रश्न राजकारणासाठीच  प्रलंबित आहे. याच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. आपण किती दिवस या सामाजाचा अंत बघणार. तुम्हाला याची सखोल माहिती आहे. तुम्ही करु नका. पण, याचं उत्तर द्यायला हवं. आता सत्तेत असणाऱ्यांनी आरक्षण द्यावं. मंडल आयोगावेळी सर्व समाजाला आरक्षण मिळालं. मराठा समाजाचा विसर पडला. त्यावेळच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व मंत्रिमंडळाने यावर भाष्य करायला हवे, असं उदयराजेंनी सांगितले.

मराठा समाजाचा मोर्चा निघाला का हेच नेते काऊंटर मोर्चे काढायला लावतात. ‘संसद आणि राज्याच्या विधीमंडळातील सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींवर मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची नैतिक जबाबदारी आहे. इतर समाजाच्या लोकप्रतिनिधींनाही मराठा समाजाने मतदान केलेले आहे. लोकांनी विश्वास ठेवला. आता आरक्षण नसल्याने विश्वास उडाला आहे. सध्या कोरोना आहे. त्यामुळे माणसे शांत आहेत. त्यामुळे हेच लोक सत्तेतून खालीही खेचू शकतात व घरातून बाहेर पडूही देणार नाहीत, असा इशाराही उदयनराजेंनी यावेळी दिला. 

थोडीतरी जनाची नाही तर मनाची पाहिजे. जाती जातीत तेढ करु नका, आरक्षण देणार नसेल तर राजीनामा द्या, असा हल्लोबोल करुन खासदार उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. त्यांना नावं ठेवली. आता सत्तांतर झालंय. तुम्ही का आरक्षणाचं काम केलं नाही. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी वकिलाला हजर होऊ दिलं नाही. त्यांना गायब केलं. मराठा समाजाला किरकोळीत काढण्याचाच हा प्रकार आहे. एखादा निर्णय घ्यायला गेलो तर हाणून पाडला जातो. दबाव टाकला जातो. 

यावेळी पत्रकारांनी तुमचा रोख शरद पवारांवर आहे का ? असे विचारले यावर उदयनराजे म्हणाले, हो सर्वांवरच आहे. त्याचबरोबर शरद पवार म्हणतात आरक्षणाचा प्रश्न उदयनराजे आणि संभाजीराजेंनी सोडवावा यावर आपले मत काय ? असा प्रश्न केल्यावर उदयनराजे म्हणाले, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवता. तुम्ही हातात बंदूक घ्या. संभाजीराजेंना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करा. फडणवीस यांनी जात पाहिली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा सत्ता द्या, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतो, ती जबाबदार माझी’ असेही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केले. 

हो ला हो म्हणणार नाही; दुसऱ्यावर खापर फोडायचं..

पत्रकार परिषदेपूर्वी  बोलताना उदयनराजेंनी अनेक बाबींवर मत स्पष्ट केले. मराठा समाजाला डावललं जातंय. स्वत: करायचे नाही मात्र, दुसऱ्यावर खापर फोडायंच काम सुरू आहे. कारण, त्यावेळी सर्व काही शक्य होतं. त्यांनी का केलं नाही, असा सवालही उदयनराजेंनी केला. तसेच शासनाने परीक्षा घेताना मराठा समाजाच्या जागा बाजुला ठेवून घ्याव्यात, असेही स्पष्टपणे सांगितले. 

Web Title: MP Udayan Raje was speaking at a press conference held at Jalmandir Palace in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.