'इतिहास जिवंत कसा राहणार?, कबर पर्यटनासाठी खुली करा'; उदयनराजेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 11:07 AM2022-11-11T11:07:52+5:302022-11-11T11:10:03+5:30

अफझल खानच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवलंच पाहिजे, असं उदयनराजे यांनी सांगितलं.

MP Udayanraje has demanded that Afzal Khan's grave should be opened for tourism. | 'इतिहास जिवंत कसा राहणार?, कबर पर्यटनासाठी खुली करा'; उदयनराजेंची मागणी

'इतिहास जिवंत कसा राहणार?, कबर पर्यटनासाठी खुली करा'; उदयनराजेंची मागणी

googlenewsNext

शौर्याचं प्रतिक असलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर अफजल खानच्या थडग्याशेजारील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाकडून हातोडा पडला आहे. पोलीस प्रशासनाने या परिसरात कलम १४४ लागू करून कठोर बंदोबस्त लावला होता. ४ जिल्ह्यातील १५०० पोलीस या परिसरात तैनात करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. 

सदर कारवाईवर आता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अफझल खानच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवलंच पाहिजे, असं उदयनराजे यांनी सांगितलं. कोणत्याही समाजाला गैरसमज करण्याची गरज नाही, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले.

आताची आणि भावी पिढी आहे, त्यांना कळायला हवं, की ही कबर इथे का आहे..?, त्यामागील इतिहास काय?, याबाबत आताची आणि भावी पिढी आहे, त्यांना कळायला हवं, असं उदयनराजे यांनी सांगितलं. तसेच पर्यटनासाठी अफजल खानची कबर खुली करायला हवी, कारण त्याशिवाय इतिहास जिवंत राहणार कसा?, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. 

कारवाईवर काय म्हणाले उपमुख्यमंत्री-

आजचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आहे. आजच्या दिवशी अफजल खानाचा वध झाला होता. २००७ साली कोर्टानं या अफजल खानच्या थडग्याजवळ असलेले अनधिकृत बांधकाम काढले पाहिजे अशी नोटीस दिली होती. २०१७ मध्ये आम्ही कारवाई सुरू केली होती. परंतु त्यात पुन्हा कायदेशीर अडचणी आल्या. आता या सर्व अडचणी दूर झाल्या असून सातत्याने शिवप्रेमींची मागणी होते त्याठिकाणचं बांधकाम तोडावं. शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले परंतु अतिक्रमण हटवलं नव्हतं. आज सगळ्यांसाठी समाधानाची गोष्ट आहे कारण त्याठिकाणचं सगळं अतिक्रमण हटवण्यात आले असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

कारवाईवर काय म्हणाले जितेंद्र आव्हाड-

इतिहास बघताना त्या नजरेने बघा, अफजल खानाची कबर जिजामातेच्या आदेशाने शिवाजी महाराजांनी बांधलीय. आता वैर संपलं असं जिजाऊंनी म्हटलं होतं. त्यानंतर ही कबर बांधलीय. इतिहासाचं विकृतीकरण करू नका हे आमचं म्हणणं आहे. जेव्हा जेव्हा लोकांना फसवायचं असतं. दिशाभूल करायची असते तेव्हा तुम्हाला धार्मिक आणि इतिहास हेच दोन आधार आहेत. त्यामुळे लोकांची डोकी फिरतात असं त्यांनी सांगितले. 

Web Title: MP Udayanraje has demanded that Afzal Khan's grave should be opened for tourism.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.