महावितरणने उचलला ४१ विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च

By admin | Published: January 29, 2016 10:53 PM2016-01-29T22:53:33+5:302016-01-29T23:52:36+5:30

अधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी : तीन महिन्यांचा भार उचलून पाल्यांना दिला दिलासा - गुड न्यूज

MSEDC withdrew 41 students' travel expenses | महावितरणने उचलला ४१ विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च

महावितरणने उचलला ४१ विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च

Next


सातारा : दुष्काळी भागातील गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण पैशाअभावी थांबू नये म्हणून ‘महावितरण’ने हातभार लावला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ४१ विद्यार्थ्यांचा तीन महिन्यांच्या एसटी पासेसचा खर्च उचलला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या पासेसचे वितरण केले.
‘जनतेसाठी विद्युतशक्ती’ हे ब्रीद घेऊन महावितरणचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांना प्रकाश देण्यासाठी २४ तास कर्तव्यतत्पर असतातच. आता दुष्काळी विद्यार्थ्यांना मोफत पास देऊन त्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडविले आहे.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी गावांतील काही गरीब शेतकऱ्यांच्या पाल्यांनी एसटी पाससाठी पैसे नसल्याने शिक्षण सोडल्याचे सामाजिक कार्यकर्ते धर्मराव जगदाळे यांच्या निदर्शनास आले. जगदाळे यांनी या विद्यार्थ्यांना पास वाटण्याचा प्रस्ताव महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर मांडला.
अधीक्षक अभियंता सुरेश गणेशकर यांनी तातडीने त्यास होकार दिला. गणेशकर यांच्यासह कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, अरविंद यादव, अनिल बडवे, विश्वास देशमुख, सतीश राजदीप, प्रभारी कार्यकारी अभियंता अजित नवाळे, व्यवस्थापक वैभव थोरात यांनी पुढाकार घेऊन पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या ४१ गरीब विद्यार्थ्यांना जानेवारी ते मार्च २०१६ या त्रैमासिक पासचे वितरण करण्याचे निश्चित केले. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सातारा क्लब हाउसमध्ये नुकतेच या पासेसचे वितरण करण्यात आले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या या मदतीमुळे गरीब विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)

अनोखा झटका..
ऐन परीक्षेच्या काळात विद्युत भारनियमन होत असल्याने विद्यार्थ्यांमधून वारंवार तक्रारी येत असतात. तर कृषिपंपासाठी पुरेशी वीज मिळत नाही, अशी ओरड शेतकऱ्यांमधून होत असते. वीजवितरण कंपनी सतत या ना त्या कारणाने झटका देत असतानाच सातारा जिल्ह्यात अनोखा झटका अनुभवयास मिळाला. ४१ विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा खर्च उचलल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: MSEDC withdrew 41 students' travel expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.