महावितरणने बदलला धोकादायक खांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:28 AM2021-06-02T04:28:53+5:302021-06-02T04:28:53+5:30

खटाव : खटाव ग्रामपंचायत कार्यालयाजवळ धोकादायक अवस्थेत असलेला विजेचा खांब अखेर महावितरण कंपनीकडून बदलण्यात आला. संभाव्य धोका टळल्याने ग्रामस्थांमधून ...

MSEDCL replaces dangerous pillar | महावितरणने बदलला धोकादायक खांब

महावितरणने बदलला धोकादायक खांब

Next

खटाव : खटाव ग्रामपंचायत कार्यालयाजवळ धोकादायक अवस्थेत असलेला विजेचा खांब अखेर महावितरण कंपनीकडून बदलण्यात आला. संभाव्य धोका टळल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीच्या जवळ असलेल्या धोकादायक खांबामुळे या परिसरातील घरांना तसेच दुकानांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे हा खांब हटवून त्या जागी नवीन खांब उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात होती. ‘लोकमत’मध्ये या समस्येबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत महावितरण कंपनीने कार्यकारी अभियंता (वडूज) सोमनाथ मुंडे, उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांनी ठेकेदार अनिल साळुंखे यांचे या समस्येकडे लक्ष वेधून हा धोकादायक खांब बदलून नवीन खांब बसविण्याच्या सूचना केल्या. यानंतर नुकताच धोकादायक खांब बदलण्यात आला.

सलग दोन वर्षांपासून हा खांब धोकादायक पद्धतीने उभा होता. उशिरा का होईना तो काढून टाकण्यात आल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

फोटो : ०१ नम्रता भोसले

Web Title: MSEDCL replaces dangerous pillar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.