गड पालिकेचा... अन् साकडं वाड्यावर !

By Admin | Published: October 21, 2016 01:15 AM2016-10-21T01:15:34+5:302016-10-21T01:15:34+5:30

उमेदवारी मिळविण्यासाठी पळापळ : तिकीट निश्चितीसाठी आजी, माजी अन् भावी नगरसेवक नेत्यांच्या घरी दाखल

The municipal corporation ... and on the other side! | गड पालिकेचा... अन् साकडं वाड्यावर !

गड पालिकेचा... अन् साकडं वाड्यावर !

googlenewsNext

सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी दोन्ही राजेंच्या वाड्यावर अनेकांनी साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. तर तिकीट मिळालेच नाही तर अपक्षही लढण्याची तयारी इच्छुक उमेदवारांनी दर्शविली आहे.
येत्या दोन दिवसांत सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. जुन्या व मातब्बरांना या वेळेस डावलून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. मनोमिलन होईल किंवा नाही, याचे आम्हाला देणे घेणे नाही. मात्र, तिकीट मिळाले पाहिजे, यासाठी अनेकांचा खटाटोप सुरू आहे. तर दोन्ही राजेंच्या निकटचे कोण आहे, याची नवखे उमेदवार चाचपणी करत आहेत. अशा लोकांना मध्यस्थी करण्यास सांगून आपल्या पदरात तिकीट पाडून घ्यायचे, असे काहींनी मनसुबे आखले आहेत. दसऱ्याच्या शुभेच्छाच्या निमित्ताने वाड्यावर गेलेल्या कार्यकर्त्यांना कामाला लागा, असे सूचक आदेश दिले आहेत. मात्र, प्रत्येकजण आम्हालाही नेत्यांनी असेच सांगितले आहे, त्यामुळे तिकीट नेमके कोणाला मिळणार, या संभ्रमात दोन्ही आघाड्यांचे कार्यकर्ते आहेत. तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्यासाठी काय करावे लागेल, याचेही इच्छुक उमेदवारांकडून आडाखे बांधले जात आहेत. (प्रतिनिधी)

कोण काढतंय जातीचा तर कोण उत्पन्नाचा दाखला !
सातारा : सातारा जिल्ह्यातील आठ नगरपालिका व सहा नगरपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणारे आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करत आहेत. जातीचा दाखला, उत्पन्नाचे विवरण, प्रतिज्ञा पत्र भरून घेण्यासाठी तहसील कार्यालयात भावी नगरसेवकांची गर्दी होत आहे.
निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. कागदपत्र नसल्यास उमेदवारी बाद होते किंवा चुकून विजयी झालो तरी एखादे कागदपत्र नाही म्हणून घरी बसावे लागते. त्यामुळे सर्व कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
यामध्ये जातीचा दाखला, वंशावळ, उमेदवारी अर्ज आदी कागदपत्रे भरून घेण्यासाठी येथील मुद्रांक विक्रेत्यांकडे इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी तयारी करत आहेत. जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्याने अर्ज दाखल करण्याच्या अगोदर इच्छुक उमेदवार नामनिर्देशन पत्र तयार करून घेत असल्याने अर्ज भरताना कोणतीही अडचण येणार नसल्याने ही पूर्व तयारी केली जात आहे.
सातारा पालिकेत अनेक उमेदवार इच्छुक असल्याने नेत्यांकडून अजूनपर्यंत उमेदवारी जाहीर केली नसली तरी उमेदवारी मिळण्याच्या आशेने इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. तर काहींनी पक्षाचे तिकीट नाही मिळाले तरी अपक्ष उभे राहण्याची मानसिकता केली असल्याने नामनिर्देशन भरण्यासाठी सातारा तहसील कार्यालयात गर्दी होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: The municipal corporation ... and on the other side!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.