पालिकेचा अग्निशमन विभाग चोवीस तास अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:45 AM2021-09-14T04:45:41+5:302021-09-14T04:45:41+5:30

सातारा : आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्याबरोबरच आपत्कालीन प्रसंगी महत्त्वाची भूमिका बजावणारा सातारा पालिकेचा अग्निशमन विभाग २४ तास अलर्ट असतो. ...

Municipal Fire Department 24 hours alert | पालिकेचा अग्निशमन विभाग चोवीस तास अलर्ट

पालिकेचा अग्निशमन विभाग चोवीस तास अलर्ट

Next

सातारा : आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्याबरोबरच आपत्कालीन प्रसंगी महत्त्वाची भूमिका बजावणारा सातारा पालिकेचा अग्निशमन विभाग २४ तास अलर्ट असतो. प्रामुख्याने रात्रीच्यावेळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक जबाबदारीने काम करावे लागते. रात्री एकनंतरही या विभागातील कर्मचारी न झोपता, न थकता आपले कर्तव्य बजावत होते.

‘लोकमत’ने केलेल्या रियालिटी चेकमध्ये अग्निशमन विभागातील अनेक बाबी समोर आल्या. सध्या पावसाळा सुरू आहे. या काळात वीज वाहिन्यांमध्ये स्पार्किंग होऊन आग लागण्याची शक्यता अधिक असते. गणेशोत्सवातही अशा दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अग्निशमन विभागाने कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामाचे वेळापत्रक तयार केले आहे. हे कर्मचारी सकाळ, दुपार व रात्र अशा तीन टप्प्यात काम करतात.

रात्री एकच्यासुमारास अग्निशमनचे तीनही कर्मचारी विभागात कार्यरत होते. अग्निशमन वाहनात काही बिघाड आहे की नाही तसेच इतर तांत्रिक बाबींची तपासणी कर्मचारी करीत होते. जम्बो कोविड रुग्णालयाच्या बाहेर तैनात असलेल्या अग्निशमनच्या वाहनातही संबंधित कर्मचारी पूर्ण तयारीनिशी कर्तव्य बजावत होते.

(चौकट)

सद्यस्थितीत दोन बंब

पालिकेच्या ताफ्यात दोन अग्निशमन बंब व एक फायटर फायटर बाईक आहे. दोन अग्निशमन बंबांपैकी एक बंब हा अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त आहे. एक बंब अग्निशमन विभागात, तर दुसरा जम्बो कोविड रुग्णालयाच्या बाहेर चोवीस तास सज्ज असतो. आपत्कालीन परिस्थितीवेळी अग्निशमन विभागाकडून इतर तालुक्यांतही मदतकार्य केले जाते.

(चौकट)

तीनही कर्मचारी जागे

अग्निशमन विभागात रात्रपाळीला चालकासह तीन कर्मचारी कार्यरत होते. हे तीनही कर्मचारी जागेच होते. त्यांचा थोडा वेळ मोबाईलवर विरंगुळा, तर थोडा वेळ सहकाऱ्यांशी गप्पा, असा उपक्रम सुरू होता. पाऊस व थंडीमुळे सर्वजण सुरक्षितस्थळी बसले होते.

(चौकट)

चालकही अलर्ट..

मदतकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह चालकाचे जागरणही सुरू होते. पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती केव्हा ओढावेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्हाला सदैव अलर्ट राहावे लागते. आता आम्हाला या गोष्टीची सवय झाली आहे, असे चालकाने सांगितले.

(चौकट)

अग्निशमन नियम

अग्निशमन सेवेचे कर्तव्य फक्त आगीपासून जीवन आणि मालमत्ता वाचविणे आणि त्यापासूनचा दुष्परिणाम कमीत-कमी करणे एवढेच नाही; तर बंद गटारे, विहिरी, उदवहन यंत्रे किंवा इतर यंत्रसामग्री यात अडकून पडलेल्यांची सुटका करणे, हेही आहे. आगीपासून संरक्षण करणे, आगीचा प्रतिबंध करणे व सेवेचा परिणामकारकरित्या वापर करून जीवित व वित्तहानी टाळणे हे देखील अग्निशमनचे कर्तव्य आहे.

(कोट)

अग्निशमन विभाग सर्व सामग्रीसह नेहमीच सज्ज असतो. आजवर शहरात रात्रीच्यावेळी मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, कधी होणार नाही, असेही आपण म्हणून शकत नाही. त्यामुळे रात्रपाळीचे सर्व कर्मचारी जबाबदारीने काम करीत असतात.

- आनंद माने, सहायक, अग्निशमन

Web Title: Municipal Fire Department 24 hours alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.