नगरपालिका, नगरपंचायतींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:44 AM2021-08-21T04:44:52+5:302021-08-21T04:44:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : डिसेंबर २०२१ रोजी मुदत संपणाऱ्या सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा ...

Municipalities, Nagar Panchayats | नगरपालिका, नगरपंचायतींचा

नगरपालिका, नगरपंचायतींचा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : डिसेंबर २०२१ रोजी मुदत संपणाऱ्या सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी याबाबतचा अध्यादेश काढला असून तो शुक्रवारी संध्याकाळी ई मेलद्वारे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.

सातारा जिल्ह्यात एकूण सोळा स्थानिक स्वराज्य संस्था असून लोणंद व मलकापूर नगरपंचायत वगळता इतर चौदा नगरपालिका आणि नगरपंचायतींची मुदत दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी संपत आहे. कोरोना संक्रमणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती; मात्र या चर्चेला राज्य निवडणूक आयोगाने पूर्णविराम दिला.

प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याची प्रक्रिया २३ ऑगस्टपासून सुरु करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी दिले आहेत. मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना वेळेवर व सुकर करणे यासाठी हा अध्यादेश काढण्यात आला आहे. यंदा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली असून, सातारा शहराच्या हद्दवाढीमुळे ४८ प्रभाग निश्चित होणार असून सातारा पालिकेसाठी यंदा अठ्ठेचाळीस नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. प्रारूप प्रभाग रचनेसाठी २०११ ची लोकसंख्या विचारात घ्यावयाची आहे. प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार तयार करताना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे काटेकोर पालन करावयाचे आहे. हद्दवाढ लागू झालेल्या नगरपालिकांनी भौगोलिक बदल आणि क्षेत्र निश्चिती करून त्याचे नकाशे नगरपालिकेने तयार करावयाचे आहेत . पालिकांनी कच्चा आराखडा पूर्ण होताच त्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाला तत्काळ कळवावी,असे आदेशही देण्यात आले आहेत.

(चौकट)

सातारा पालिका लेखाजोखा :

- हद्दवाढीमुळे एकूण वॉर्ड ४८

- नगरसेवक ४८

- एक सदस्यीय वॉर्डरचना

- हद्दवाढीमुळे वाढलेली लोकसंख्या ६१,०००

- २४ ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोग घेणार जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक

Web Title: Municipalities, Nagar Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.