खुनातील आरोपीला दीड वर्षानंतर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 05:24 PM2019-10-14T17:24:16+5:302019-10-14T17:26:11+5:30
युवकाचा खून केल्यानंतर फरार झालेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल दीड वर्षानी अटक केली. अजिंक्य उर्फ सोन्या काशिनाथ देसाई (वय ३०, रा. चाहूर, संगम माहुली, ता.सातारा) असे अटक झालेल्या संशयिताचे नाव आहे.
सातारा : युवकाचा खून केल्यानंतर फरार झालेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल दीड वर्षानी अटक केली. अजिंक्य उर्फ सोन्या काशिनाथ देसाई (वय ३०, रा. चाहूर, संगम माहुली, ता.सातारा) असे अटक झालेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संदीप रमेश भणगे (वय २८, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) हा ५ मे २०१८ रोजी सकाळी घराबाहेर पडला. मात्र, रात्री अकरा वाजेपर्यंत घरी आला नव्हता. त्यामुळे संदीपला शोधण्यासाठी त्याचे वडील राजवाड्याकडे निघाले होते. त्याचवेळी त्यांना मुलगा संदीप व संशयित आरोपी प्रसाद कुलकर्णी (वय २८), प्रथमेश कुलकर्णी (वय २०), प्रशांत धावेकर (वय २३, सर्वरा. व्यंकटपुरा पेठ), अजिंक्य उर्फ सोन्या देसाई (वय ३०, रा. चाहूर,) हे चौघे दिसले.
तू सातारा शहर पोलीस ठाण्यातील केस मागे का घेत नाहीस, तुला आता जिवंत ठेवत नाही, असे म्हणत संशयितांनी संदीप भणगेच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण करून त्याचा खून केला होता. हा सर्व प्रकार संदीपच्या वडिलांनी पाहिला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली होती. परंतु अजिंक्य देसाई हा फरार होता. तब्बल दीड वर्षानंतर तो पोलिसांच्या हाती लागला. तो रात्री घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सहायक फौजदार विलास नागे, पृथ्वीराज घोरपडे, ज्योतीराम बर्गे, हवालदार विनोद गायकवाड, मोहन नाचन, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, धीरज महाडिक, केतन शिंदे, वैभव सावंत, साहेबराव साबळे यांनी ही कारवाई केली