Crime News Satara: रस्त्यातील गाडी बाजूला काढ म्हटला, रागाने डोक्यात कोयता घातला; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 01:56 PM2022-06-11T13:56:21+5:302022-06-11T13:57:11+5:30

याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात आठजणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला असून, यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Murder attack on a young man out of anger at being asked to pull over on the side of the road in satara | Crime News Satara: रस्त्यातील गाडी बाजूला काढ म्हटला, रागाने डोक्यात कोयता घातला; तिघांना अटक

Crime News Satara: रस्त्यातील गाडी बाजूला काढ म्हटला, रागाने डोक्यात कोयता घातला; तिघांना अटक

Next

सातारा : शतपावली करत असताना रस्त्यातील गाडी बाजूला काढ म्हटल्याच्या कारणावरून एका तरूणाच्या डोक्यात काेयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. यामध्ये संबंधित तरूण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात आठजणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला असून, यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्रथमेश बाळासाहेब जगताप (वय २०, रा. वर्ये, ता. सातारा), आदर्श हणमंत रणखांबे (वय २१, रा. मंगळापूर, ता. कोरेगाव), अनिल रत्नदीप जाधव (वय २३, तांदूळवाडी, ता. कोरेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काैशल लक्ष्मण बेबले (वय २६, रा. रामनगर, सातारा) हा शुक्रवारी रात्री साठेआठ वाजता गावातूनच शतपावली करत निघाला होता. त्यावेळी वरील संशयित हे रस्त्याच्याकडेला बसले होते. त्यांनी दुचाकी रस्त्यात लावली होती. ही दुचाकी बाजूला काढ, असे काैशल बेबले याने सांगितल्यानंतर त्यांच्यामध्ये शाब्दीक वादावादी झाली. त्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले. रात्री पावणेदहा वाजता वरील संशयितांनी आपले सात ते आठ मित्र आणून काैशल बेबलेवर हल्ला केला. यावेळी आदर्श रणखांबे याने काैशलच्या डोक्यात कोयता मारला. तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण केली.

काैशलचे भाऊ व मित्र तेथे येताच संशयितांनी तेथून पलायन केले. गंभीर जखमी झालेल्या काैशलला तातडीने साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकाराची सातारा तालुका पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तिघा संशयित आरोपींना अटक केली. त्यांचे इतर साथीदार फरार असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक मनोहर फरांदे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Murder attack on a young man out of anger at being asked to pull over on the side of the road in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.