चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून, साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 03:34 PM2022-06-18T15:34:38+5:302022-06-18T15:41:28+5:30

शीला माहेरी जाते या कारणावरून सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली. तर पती दादासो फाळके याने चारित्र्याच्या संशयावरून शीलाचा गळा दाबून खून केला.

Murder by strangulation of wife on suspicion of character in Satara | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून, साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून, साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

Next

सातारा : चारित्र्याच्या संशयावरून शीला दादासो फाळके (वय ३०, रा. कूपर काॅलनी, सदर बझार सातारा) या विवाहितेचा पतीने गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात उघडकीस आला. ही घटना दि. १७ रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.

पती दादासो गणपत फाळके, सासू अरुणा गणपत फाळके, सासरे गणपत मारुती फाळके, दीर सागर गणपत फाळके (सर्व रा. कूपर काॅलनी, सदर बझार, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शीला हिचे दादासो फाळके याच्यासोबत आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरू होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजता शीला फाळके ही घरातील बेडरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. त्यानंतर तिला घरातल्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेनंतर नातेवाइकांनी शीलाचा खून झाला असून, संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. जिल्हा शासकीय रुग्णालयात शीलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्यामुळे शवविच्छेदन अहवाल पोलिसांना समजू शकला नाही.

परंतु शीला माहेरी जाते या कारणावरून सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली. तर पती दादासो फाळके याने चारित्र्याच्या संशयावरून शीलाचा गळा दाबून खून केला. अशी तक्रार मोनिका जर्नादन साठे (रा. सदर बझार, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पती दादासो फाळके याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Web Title: Murder by strangulation of wife on suspicion of character in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.