उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून युवकाचा खून, खंडाळा तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 07:41 PM2022-05-02T19:41:02+5:302022-05-02T19:41:28+5:30

शिरवळ : उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून कु-हाडीने वर्मी घाव घालून एका युवकाचा खून करण्यात आला. खंडाळा तालुक्यातील ...

Murder of a youth for demanding repayment of loan, incident in Khandala taluka | उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून युवकाचा खून, खंडाळा तालुक्यातील घटना

उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून युवकाचा खून, खंडाळा तालुक्यातील घटना

googlenewsNext

शिरवळ : उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून कु-हाडीने वर्मी घाव घालून एका युवकाचा खून करण्यात आला. खंडाळा तालुक्यातील भादे येथील दगडे वस्ती, होडी येथे ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली. उमेश पुरंदर काळे (वय २८, रा. दगडे वस्ती, होडी, भादे ता. खंडाळा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेनंतर एका महिलेसह चौघे फरार झाले आहेत.

याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भादे येथील दगडे वस्ती, होडी याठिकाणी उमेश काळे हा कुटुंबियांसमवेत राहण्याकरिता आहे. दरम्यान, काल, रविवारी उमेश हा कुटुंबियांसमवेत घरासमोर बसला असताना त्याठिकाणी घरासमोर मैनेश मुकेश भोसले व इतर हे झाडाची कुऱ्हाडीने साल काढीत बसले होते. यावेळी उमेश काळे याने मैनेश भोसले याला माझ्या मोटारसायकलचा हप्ता थकीत असल्याचे सांगत उसणे घेतलेले पैसे मागितले. यावेळी या दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली.

दरम्यान, बाचाबाची सोडविण्यासाठी आलेल्या उमेशच्या पत्नीला मैनेश याने शिवीगाळ करत कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उमेशने हीच कुऱ्हाड मैनेशच्या डोक्यात मारली. यानंतर नीलेश भोसले, हेश भोसले व राजनंदिनी भोसले यांनी उमेश धरले. यावेळी मैनेश याने उमेशवर कुऱ्हाडीने वार करत मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर संशयित एका महिलेसह चौघे तेथून फरार झाले.

जखमी उमेश याला प्राथमिक उपचाराकरिता तरडगाव, लोणंद येथील रुग्णालयात नेले असता त्याठिकाणी दाखल करुन घेतले नाही. यानंतर सातारा येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी उमेशचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यामध्ये खळबळ उडाली असून चारही आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहे.  घटनेची फिर्याद उमेश काळे याच्या पत्नीने शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत

Web Title: Murder of a youth for demanding repayment of loan, incident in Khandala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.