खूनप्रकरणातील संशयिताचा कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 05:59 PM2020-02-29T17:59:11+5:302020-02-29T18:00:03+5:30

पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, ता. सातारा) या युवकाचा खुनाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या साहिल रुस्तूम शिकलगार ( रा. नागठाणे, ता. सातारा) याने गुरुवारी सायंकाळी पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A murder suspect attempts to escape from the closet | खूनप्रकरणातील संशयिताचा कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न

खूनप्रकरणातील संशयिताचा कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देखूनप्रकरणातील संशयिताचा कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्नसंशयित सातारा शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपला

सातारा : पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, ता. सातारा) या युवकाचा खुनाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या साहिल रुस्तूम शिकलगार ( रा. नागठाणे, ता. सातारा) याने गुरुवारी सायंकाळी पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आष्टे, ता. सातारा येथील तेजस जाधव या युवकाचा खंडणीसाठी अपहरण करुन खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात साहिल शिकलगारसह अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपला या संशयितांना ठेवण्यात आले आहे.

गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास यातील साहिल शिकलगार याला चौकशीसाठी बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी लॉकअपचा दरवाजा उघडला होता. यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी साहिलच्या जागेवरच पकडले. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Web Title: A murder suspect attempts to escape from the closet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.