वडजल येथील खुनाचा तीन दिवसांत छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 03:23 PM2019-12-02T15:23:07+5:302019-12-02T15:24:29+5:30

वडजल, ता. फलटण येथे झालेल्या खूनप्रकरणाचा छडा तीन दिवसांत लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, हा खून पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील दोघांना अटक केली आहे.

Murder at Vadjal in three days | वडजल येथील खुनाचा तीन दिवसांत छडा

वडजल येथील खुनाचा तीन दिवसांत छडा

Next
ठळक मुद्देवडजल येथील खुनाचा तीन दिवसांत छडाअकलूजमधील दोघांना अटक : पूर्व वैमनस्यातून प्रकार

सातारा : वडजल, ता. फलटण येथे झालेल्या खूनप्रकरणाचा छडा तीन दिवसांत लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, हा खून पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील दोघांना अटक केली आहे.

रोशन अविनाश भोसले (वय २०), सनी उर्फ भोलेशंकर चंद्रकांत भोसले (वय १८, दोघेही रा. इंदिरानगर झोपडपट्टी अकलूज, सोलापूर, सध्या रा. बडेखान, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रकाश फोरमन पवार (वय ४०, रा. शिंदेवाडी, ता. फलटण) यांचा २९ नोव्हेंबर रोजी फलटण येथील वडजल गावच्या हद्दीत गळा चिरून खून करण्यात आला होता. आरोपींनी पाठीमागे कसलेही पुरावे सोडले नव्हते. त्यामुळे हा खून उघडकीस आणणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, रोशन आणि सनी भोसले हे दोघे घटनेदिवशी प्रकाश पवार याच्यासोबत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला. त्यावेळी रोशन भोसले हा पुणे येथे तर सनी भोसले हा अकलूजला पळून गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने दोन टीम तयार करून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली.

पुणे व सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून वेगवेगळ्या ठिकाणाहून दोघांनाही पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी प्रकाश पवार याचा खून केल्याची कबुली दिली. प्रकाश पवार व आरोपींच्या कुंटुंबीयांचा पैशाच्या देवाण घेवाणवरून वाद होता.

तसेच प्रकाश पवार यांच्या नात्यातील मुलगी आरोपी यांच्या नात्यातील एका व्यक्तिने घेऊन गेला होता. यावरून मयत प्रकाश पवार हे आरोपींना व त्यांच्या नातेवाईकांना फलटणला आल्यास सतत गाडी अडविणे, मारहाण करणे असे प्रकार करत होता. त्यामुळे रोशन आणि सनी हे दोघे चिडून होते.

फलटणमधील श्रीराम रथ यात्रेसाठी २७ नोव्हेंबर रोजी रोशन आणि सनी हे दोघे आले होते. सायंकाळी सात वाजता यात्रेतून परत जात असताना जिंतीनाका परिसरामध्ये प्रकाश पवार हा दारू पिऊन रस्त्यावर पडलेला त्यांना दिसला. त्याला घेऊन ते वडजल रस्त्यावरील निर्जनस्थळी घेऊन गेले. कटरच्या साह्याने पवार याचा गळा चिरून खून केला. त्यानंतर तेथून ते पसार झाले. या दोघांसमवेत आणखी एकजण होता. पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड, हवालदार उत्तम दबडे, पोलीस नाईक योगेश पोळ, प्रवीण फडतरे, अजीत कर्णे, प्रवीण कडव, विक्रम पिसाळ, वैभव सावंत, संजय जाधव यांनी केली.
 

 

Web Title: Murder at Vadjal in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.