ऊसतोडीच्या कारणातून पत्नीचा खून; पतीला अटक : डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 06:52 PM2020-04-02T18:52:23+5:302020-04-02T18:54:03+5:30

बुधवारी रात्रीही नऊच्या सुमारास त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादात लालाने पत्नी सारिकाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. त्यामुळे सारिका रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. सारिकाचा आवाज ऐकून आसपासच्या ऊसतोड मजूर त्याठिकाणी धावले.

Murder of wife by reason of seduction | ऊसतोडीच्या कारणातून पत्नीचा खून; पतीला अटक : डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण

ऊसतोडीच्या कारणातून पत्नीचा खून; पतीला अटक : डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण

Next

क-हाड/उंडाळे : ऊसतोडीच्या कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण करीत पतीने पत्नीचा खून केला. कºहाड तालुक्यातील मनव येथे बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

सारिका लाला डावरे (वय २९, मूळ रा. भूम, जि. उस्मानाबाद, सध्या रा. मनव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती लाला शहाजी डावरे (वय ३४) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कºहाड तालुक्यातील मनव येथे गणपती मंदिरानजीक असलेल्या बेघर वस्तीजवळ ऊसतोड मजुरांची टोळी वास्तव्यास आहे. हे सर्व मजूर कारखान्याला ऊस तोडणीसाठी उस्मानाबादच्या भूम येथून आले आहेत. या टोळीतील लाला डावरे याचा काही दिवसांपासून पत्नीशी वाद सुरू होता. बुधवारी रात्रीही नऊच्या सुमारास त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादात लालाने पत्नी सारिकाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. त्यामुळे सारिका रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. सारिकाचा आवाज ऐकून आसपासच्या ऊसतोड मजूर त्याठिकाणी धावले.

पोट मुकादम रामभाऊ कुचेकर यांनी याबाबतची माहिती पोलीस पाटील अनिता पोळ यांना दिली. पोलीस पाटील त्याठिकाणी पोहोचल्यानंतर सर्वांनी जखमी सारिकाला उपचारार्थ रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर क-हाड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांच्यासह हवालदार जाधव, धनंजय कोळी, गुन्हे शाखेचे सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन

याबाबत पोलीस पाटील अनिता पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लाला डावरे याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड तपास करीत आहेत.


नेमके कारण अद्याप अस्पष्ट
ऊसतोडीच्या कारणावरून लाला डावरे याचा पत्नी सारिकाशी वाद होत होता, अशी माहिती प्राथमिक तपासातून पोलिसांना मिळाली आहे. मात्र, नेमका वाद काय होता, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या खुनामागे ऊसतोडीचे कारण आहे की अन्य काही कारणावरून खून झाला, याबाबतचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

 

Web Title: Murder of wife by reason of seduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.