खळबळजनक! डोक्यात दगड घालून युवतीचा खून, उसाच्या फडात आढळला मृतदेह; कराड तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 11:12 AM2022-01-03T11:12:32+5:302022-01-03T11:16:15+5:30

मृत युवतीची ओळख पटविण्याचे तसेच मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Murder of a young woman by throwing a stone at her head incident in Karad taluka | खळबळजनक! डोक्यात दगड घालून युवतीचा खून, उसाच्या फडात आढळला मृतदेह; कराड तालुक्यातील घटना

खळबळजनक! डोक्यात दगड घालून युवतीचा खून, उसाच्या फडात आढळला मृतदेह; कराड तालुक्यातील घटना

googlenewsNext

कऱ्हाड : डोक्यात दगड घालून युवतीचा खून करण्यात आला. कराड तालुक्यातील कोरेगाव गावामध्ये आज, सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. उसाच्या फडात युवतीचा मृतदेह आढळला असून कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तातडीने त्याठिकाणी दाखल झाले आहे. मृत युवतीची ओळख पटविण्याचे तसेच मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव गावच्या हद्दीत कार्वे ते कोरेगाव जाणाऱ्या रस्त्यालगत भैरोबा मंदिर आहे. या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. सोमवारी सकाळी काही शेतकरी याठिकाणी गेले असता त्यांना युवतीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. 

त्यानंतर पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह पथक तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी केली असता युवतीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. मात्र संबंधित युवती गावातील नसल्यामुळे तिची ओळख पटली नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला आहे. 

कऱ्हाड तालुक्यात गत आठ महिन्यांपासून खून सत्र सुरू आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे तालुक्यातील सामाजिक वातावरण बिघडले आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच कोरेगावमध्ये आणखी एका युवतीचा खून झाल्यामुळे खळबळ उडाली असून युवतीची ओळख पटविण्यासह मारेकऱ्यांचा तपास करण्याचे आव्हान सध्या कराड ग्रामीण पोलिसांसमोर आहे.

Web Title: Murder of a young woman by throwing a stone at her head incident in Karad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.