नागठाणे येथे २५ लाखांच्या खंडणीसाठी युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:07 PM2020-02-22T12:07:46+5:302020-02-22T12:09:24+5:30

पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, ता. सातारा) या युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना नागठाणे, ता. सातारा येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.

Murder of a youth for ransom of Rs | नागठाणे येथे २५ लाखांच्या खंडणीसाठी युवकाचा खून

नागठाणे येथे २५ लाखांच्या खंडणीसाठी युवकाचा खून

Next
ठळक मुद्देनागठाणे येथे २५ लाखांच्या खंडणीसाठी युवकाचा खूनदोघे ताब्यात : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा : पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, ता. सातारा) या युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना नागठाणे, ता. सातारा येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.

आशिष साळुंखे, साहिल शिकलगार (दोघेही रा. नागठाणे, ता. सातारा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, तेजस जाधव याला व्यायामाची आवड होती. तो नेहमीप्रमाणे ११ डिसेंबर २०१९ रोजी नागठाणे येथे व्यायामासाठी दुचाकीवरून गेला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्याच्या घरातल्यांनी त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्यामुळे त्याचे वडील तेजस जाधव यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तेजस बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.

दरम्यान, आष्टे गावापासून जवळच तेजसची दुचाकी तो बेपत्ता झाला त्याच दिवशी सापडली होती. त्या ठिकाणी दुसऱ्या एका गाडीची चावीसुद्धा आढळून आली होती. हा सारा प्रकार वडील विजय जाधव यांनी बोरगाव पोलिसांना सांगितला होता. गत दोन महिन्यांपासून तेजसचा सर्वजण शोध घेत होते. याचवेळी एकाचा तेजसच्या वडिलांना फोन आला. ह्यतुमच्या मुलाचे २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केले आहे,ह्ण असे त्यांना सांगण्यात आले.

या फोनची माहिती त्यांनी बोरगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आशिष साळुंखे याला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्याकडून फारसी माहिती उपलब्ध न झाल्याने त्याला सोडून देण्यात आले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी या खून प्रकरणाचा उलगडा झाला. आशिष साळुंखे आणि त्याचा मित्र साहिल शिकलगार यांना पोलिसांनी त्याब्यात घेतले आहे. दोघांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. त्यानंतर मृतदेहही दाखविला.

विहिरीत मृतदेह बांधून ठेवला

तेजसचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह नागठाणे येथील एका विहिरीमध्ये तळाला बांधून ठेवला. पोलिसांनी शुक्रवारी मोटार लावून पाणी बाहेर काढले. त्यानंतर तेजसचा मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आला. या दोघांनी तेजसचे नेमके कसे अपहरण केले, याची कसून चौकशी पोलीस करत आहेत.
 

Web Title: Murder of a youth for ransom of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.