कºहाडातील रस्त्यावर मुरूमाची मलमपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:02 PM2017-08-03T15:02:14+5:302017-08-03T15:04:25+5:30

Muromaki bandage on a bust road | कºहाडातील रस्त्यावर मुरूमाची मलमपट्टी

कºहाडातील रस्त्यावर मुरूमाची मलमपट्टी

Next
ठळक मुद्देकºहाड पालिकेच्यावतीने काम जोमात कºहाड शहरातील चरी मुजवण्यास सुरूवातऐन पावसात कामाची घाईकामामुळे वाहतूक कोंडी


कºहाड (जि. सातारा) : कºहाड पालिकेचे काम म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते म्हणजे उशीरा सुचलेल शहाणपण होय. कारण अगोदर रस्त्याचे काम करायचे नंतर त्यामध्ये काहीतरी राहिले असल्याची आठवण झाली की पुन्हा त्या रस्त्याच्या खुदाई करायची. हे रस्ता खुदाईचे काम शहरातील नागरिकांना नवे नाही. सध्या शहरात ठिकठिकाणी पालिकेच्यावतीने रस्त्यांवर पडलेल्या चरी मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्यांवरील चरींवर मुरूमांचा भराव टाकत चरीमुक्त शहर करण्याचे ठरविलेले धोरण हे कितपत टिकेल, असा प्रश्न सध्या नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.


पावसाळा जवळ आला की कºहाड शहरात पडलेले खड्डे मुजविण्याचे काम हे पालिकेच्या बांकाम विभागाकडून केले जाते ही गोष्ट शहरातील प्रत्येकाला माहित आहे. पावसाळा जवळ आला की कºहाड हे खड्ड्यांचे शहर म्हणून पूर्वी ओळखले जाई. रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हे किती निकृष्ठ दर्जाचे आहे हे पावसाळ्यात दिसून येते.

सध्या कºहाड पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कर्मचाºयांच्यावतीने शहरात ठिकठिकाणी चोवीस तास पाणी पुरवठा योजना पाईपलाईन दुरूस्ती तर काही ठिकाणी खोदण्यात आलेल्या चरींवर मुरूम टाकण्याचे काम सुरू केले आहे. खोदलेल्या चरींवर मुरूमांचा भराव टाकून तात्पूर्ती मलमपट्टी करणाºया या पालिकेच्या कर्मचाºयांकडून अजून किती दिवस असे काम केले जाणार असा प्रश्न सध्या नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.


शहरातील उर्दू हायस्कूल परिसर, भेदा चौक तसेच बसस्थानक परिसरात खोदण्यात आलेल्या चरी मुरूमाचा भराव टाकून जरी मुजविल्या तरी पावसाच्या पाण्यामुळे चरींवरील मुरूम किती दिवस टिकून राहणार हे सांगणे येणे कठिण आहे.


कामामुळे वाहतूक कोंडी


कºहाड येथील बसस्थानक परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौकात पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कर्मचाºयांच्यावतीने गुरूवारी सकाळपासून रस्त्यावरील चरींवर मुरूम टाकण्याचे काम केले जात होते. याठिकाणी चौकात मोठ्या प्रमाणात वडाप वाहने उभी केली जातात. अगोदरच चरीमुजविण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याने त्यात वडापवाहने उभी राहत असल्याने या ठिकाणी दिवसभरात अनेकवेळा वाहतूक कोंडी निर्माण झाली.

Web Title: Muromaki bandage on a bust road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.