नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने साताऱ्यात पाश्चिमात्य वाद्य अन् पारंपरिक गाण्यांची संगीत सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 10:14 PM2024-10-11T22:14:09+5:302024-10-11T22:30:44+5:30
नटराज मंदिरमध्ये कार्यक्रम : साताऱ्यातील २५ गिटार वादकांचे अद्भभूत सादरीकरण.
लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : ज्या वाद्याचा वापर जॅझ, राॅक या प्रकारांसाठीच जगभर केला जातो, त्या वाद्याच्या संगतीने नटराज मंदिरात चक्क शास्त्रीय गायनाची मैफिल रंगली. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात २५ गिटार वादकांनी आपली संगीत सेवा दिली.
येथील श्री उत्तर चिदंबरम नटराम मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गिटार गुरू प्रतिक सदामते यांच्या विद्यार्थ्यांनी ही संगीत सेवा दिली. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील सुर निरागस हो या गीताने मैफिलीची सुरूवात झाली. त्यानंतर नमो नमो जी शंकरा हे गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. गिटारवर या गितांचे सादरीकरण एेकुन सर्वचजण मंत्रमुग्ध झाले. शास्त्रीय गायिका वनिता कुंभार यांनी सादर केलेल्या माझी रेणुका माऊली, काैसल्येचा राम या गीतांनी अनोखा माहोल तयार केला. त्यांना अमित जाधव यांनी तबल्यावर साथ केली. मनमंदिरा, राधा कैसे ना जले ही गीते प्रतिक सदामते यांनी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी सदामते यांनी केले. या अनोख्या कार्यक्रमाला भक्तांनी उत्सफुर्त दाद दिली.
१. यांनी दिली संगीत सेवा
मुख्य गीटारवादक प्रतिक सदामते, विजय साळुंखे, अनुजा बोकील, चैत्रा स्वामी, गार्गी रेवले, यश केंजळे, ऋजुता जोशी, गायन वनिता कुंभार, गीटार साथ शरयू साखरे, सेल्वी शेजवळकर, श्रेया डोंगरे, आरोही मंडोवारा, अद्वैत ढवळकीर, अनन्या लिपारे, अर्णव पवार, आयुष काटकर, डाॅ. सुनिता चाैधरी, आदिनाथ बागवडे, सारिका गोहेल, वेदश्री देशपांडे, सइर् कर्वे, शुभांगी घाडगे, विनीत कदम, राघव फरांदे आणि तेजस माने.
पाश्वात्य संगीताचा हक्काचा साथीदार म्हणून गीटारकडे पाहिले जाते. पण भारतीय शास्त्रीय संगीतातही गीटाराची लय काय जादू करू शकते याचा अनुभव नटराज मंदिरातील कार्यक्रमात उपस्थितांनी अनुभवली. यात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या कष्टाला टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी दाद दिली हे महत्वाचे.
- वनिता कुंभार, गायिका