पर्यावरण संतुलनासाठीच ‘माझी वसुंधरा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 04:06 AM2021-01-05T04:06:18+5:302021-01-05T04:06:18+5:30

फलटण : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान हाती घेण्यात आले आहे. फलटण तालुक्यातही ...

The 'My Earth' campaign for environmental balance | पर्यावरण संतुलनासाठीच ‘माझी वसुंधरा’ अभियान

पर्यावरण संतुलनासाठीच ‘माझी वसुंधरा’ अभियान

Next

फलटण : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान हाती घेण्यात आले आहे. फलटण तालुक्यातही या अभियानाला सुरुवात झाली आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांच्या आधारे हे अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अस्मिता गावडे यांनी दिली.

वसुंधरा अभियानात फलटण तालुक्यातील विडणी गावाने सहभाग घेतलेला आहे. त्याच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, सहायक गटविकास अधिकारी गुळवे, ग्रामविकास अधिकारी दिलीप ननावरे, सचिव सहदेव शेंडे, सरपंच रुपाली अभंग, उपसरपंच नवनाथ पवार, ग्रामविकास अधिकारी डी. बी. चव्हाण, पोलीस पाटील धनाजी नेरकर, प्राचार्य पी. टी. अभंग यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांनुसार पर्यावरण रक्षणाच्या हेतूने कामे केली जाणार आहेत. राज्यात या अभियानाअंतर्गत पंचतत्त्वानुसार चांगली कामे करणाऱ्या गावांचा, नगरपरिषदांचा व पालिकांचा गौरव केला जाणार आहे. १५०० गुणांचे हे अभियान असणार आहे. पृथ्वी ६०० गुण, वायू १०० गुण, जल ४०० गुण, अग्नी १०० गुण, आकाश ३०० गुण असे मिळून १५०० गुण या अभियानासाठी आहेत, अशी माहिती डॉ. अमिता गावडे यांनी दिली.

जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींचा झपाट्याने विस्तार होत आहे. या गावांतील पर्यावरणाचा समतोल साधावा, या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापासून हे अभियान सुरू झालेले आहे. ज्या गावांची लोकसंख्या जास्त आहे, अशा गावांची निवड या अभियानात केली जाणार आहे.

फोटो ०४फलटण

वसुंधरा अभियानात विडणी गावाचा सहभाग झाल्यानंतर माझी वसुंधराची प्रतिज्ञा घेताना फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, डॉ. बाळासाहेब शेंडे व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The 'My Earth' campaign for environmental balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.