बेलवडेत ‘माझे गाव, माझे झाड’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:42 AM2021-08-24T04:42:38+5:302021-08-24T04:42:38+5:30

पर्यावरणाचा बिघडलेला समतोल सावरून ऑक्सिजन वाढीसाठी सरपंच डॉ. सुशांत मोहिते यांच्या संकल्पनेतून गावात हा उपक्रम राबविण्यात आला. प्रत्येकाने झाडे ...

‘My Village, My Tree’ initiative in Belwade | बेलवडेत ‘माझे गाव, माझे झाड’ उपक्रम

बेलवडेत ‘माझे गाव, माझे झाड’ उपक्रम

Next

पर्यावरणाचा बिघडलेला समतोल सावरून ऑक्सिजन वाढीसाठी सरपंच डॉ. सुशांत मोहिते यांच्या संकल्पनेतून गावात हा उपक्रम राबविण्यात आला. प्रत्येकाने झाडे लावून व त्यांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी घेऊन या उपक्रमात सहभाग घ्यावा, अशी ही संकल्पना आहे. गावातील अंगणवाडी परिसरासह दत्त मंदिर परिसर, सार्वजनिक रस्त्यानजीक, ग्रामपंचायत कार्यालयासमोर, स्मशानभूमी परिसरात विविध ठिकाणी झाडे लावण्यात आली. झाडांना ठिबकद्वारे पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी गणेश साळुंखे यांनी विशेष पुढाकार घेऊन मार्गदर्शन केले.

हंबीरराव मोहिते, गणेश साळुंखे, नितीन मोहिते, सुरेश मोहिते, गणेश मोहिते, जाफर पटेल, विनोद मोहिते, प्रवीण मोहिते, विराज मोहिते, मानसिंग मोहिते, रूपेश मोहिते, निलेश मोहिते, उमेश मोहिते, प्रदीप मोहिते, ओंकार मोहिते, प्रतीक मोहिते, अथर्व मोहिते, शिवम मोहिते, प्रज्वल मोहिते, विकास साळुंखे, वर्धन पाटील, ओम जाधव, महेश मोहिते, प्रसाद मोहिते, स्वरूप मोहिते, अक्षय वडार, गणेश धोत्रे, श्लोक मोहिते, श्रेयस मोहिते, संजय मोहिते, अंकुश धोत्रे, महेश साळुंखे, दिग्विजय मोहिते यांसह गावातील तरुण उपस्थित होते.

Web Title: ‘My Village, My Tree’ initiative in Belwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.