कारच्या धडकेत नागाचे कुमठेतील युवक ठार

By Admin | Published: February 21, 2015 11:25 PM2015-02-21T23:25:59+5:302015-02-21T23:45:38+5:30

यात्रेतील सर्व कार्यक्रम रद्द : कार चालकाला पाठलाग करून पकडले

Naga's youth wand killed in the car | कारच्या धडकेत नागाचे कुमठेतील युवक ठार

कारच्या धडकेत नागाचे कुमठेतील युवक ठार

googlenewsNext

वडूज : दुचाकीवरून नागाचे कुमठेहून वडूजला येत असताना समोरून आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील विजय महादेव मांडवे (वय २०) या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी साडेपाचच्या सुमारास नायकाचीवाडी येथे झाला.
पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विजय हा येथील गौरीशंकर पॉलिटेक्निकमध्ये शिकत होता. त्यांच्या गावची यात्रा असल्याने तो घरी आला होता. शुक्रवारी सायंकाळी तो त्यांच्या किराणा मालाच्या दुकानात बसला होता. त्यावेळी त्याचा मित्र मंगेश रणदिवे तेथे आला. दुकानातील माल आणण्यासाठी दोघेही दुचाकीवरून वडूजला निघाले. त्यावेळी विजय हा दुचाकी चालवत होता. नायकाचीवाडीजवळ हे दोघे आले असता समोरून आलेल्या कारने (एमएच १२ सीआर ३६१३) त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की विजयच्या उजव्या पायास गंभीर दुखापत झाली. तसेच त्याच्या छातीस आणि हनवटीस जबर मार लागला. तर त्याचा मित्र मंगेशही गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कारचे दोन्ही टायर फुटले. अशा अवस्थेतही कारचालकाने तेथून पलायन केले. उपसरपंच चंद्रकांत मांडवे हे तेथून जात होते. कार चालकाची त्यांना शंका आल्याने त्यांनी कारचा पाठलाग सुरू केला. बरेच अंतर पुढे गेल्यानंतर गोसाव्याचीवाडी येथे त्यांना कार अडविण्यात यश आले. त्यानंतर त्यांनी औंध पोलिसांना तत्काळ तेथे बोलावून कार चालकाला ताब्यात दिले. गावात परत आल्यानंतर चुलत भावाचाच अपघात झाल्याचे उपसरपंच चंद्रकांत मांडवे यांना समजले. तोपर्यंत विजय मांडवे आणि मित्र मंगेशला वडूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विजयचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. (प्रतिनिधी)

Web Title: Naga's youth wand killed in the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.