‘शिवक्रांती’कडून गावाच्या नावाचे फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:38 AM2021-03-18T04:38:35+5:302021-03-18T04:38:35+5:30
पेट्री : कुसुंबीमुरा (चिकणवाडी) ते मोळेश्वर या मार्गावर गावांची नावे असणारे कोणतेही फलक नव्हते. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांची ...
पेट्री : कुसुंबीमुरा (चिकणवाडी) ते मोळेश्वर या मार्गावर गावांची नावे असणारे कोणतेही फलक नव्हते. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांची फसणूक व्हायची म्हणून शिवक्रांती हिंदवी सेनेच्या वतीने चिकणवाडी, जन्नी चिकणवाडी, कोकरेवाडी, गोरेवाडी, शिंदेवाडी, आखाडेवाडी, मोळेश्वर या प्रत्येक वाडीमध्ये मुख्य ठिकाणी नावांचे फलक लावण्यात आले.
या कामासाठी शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीण कदम, जावळी तालुकाध्यक्ष शिवाजी गोरे, सदस्य नवनाथ कोकरे, निखिल घोरपडे, प्रदीप कदम, जगन्नाथ शिंदे, ऋषीकेश शिंदे, संजय कोकरे, प्रकाश कोकरे, महेश कोकरे, सुरेश चिकणे, रोहन चिकणे, समीर कोकरे, सूरज कोकरे, तसेच इतर मावळ्यांनी परिश्रम घेतले.
मोहाट गावचे सुपुत्र गणेश सपकाळ यांची शिवक्रांती हिंदवी सेना जावळी तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांनी शिवक्रांतीचे कार्य प्रामाणिकपणे करू, अशी ग्वाही दिली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचावतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.