मंदिरांवरून महाबळेश्वरवाडी नाव

By admin | Published: March 27, 2015 10:57 PM2015-03-27T22:57:57+5:302015-03-27T23:59:09+5:30

निसर्गरम्य ठिकाण : दोन्ही महायुद्धांत अनेक सुपुत्रांचा सहभाग

Name of Mahabaleshwarwadi from the temple | मंदिरांवरून महाबळेश्वरवाडी नाव

मंदिरांवरून महाबळेश्वरवाडी नाव

Next

सिद्धार्थ सरतापे - वरकुटे मलवडी  ता. माण या गावापासून पश्चिमेस तीन किलोमीटर अंतरावर आणि श्री भोजलिंग डोंगराच्या जवळ निसर्गरम्य परिसरात वसलेल्या महाबळेश्वरवाडीला ऐतिहासिक महत्त्व आहे. या गावाच्या उत्तरेस स्वयंभू श्री महादेवाचे मंदिर तर पूर्वेस हेमाडपंथी हरिश्वराचे मंदिर आहे. या दोन्ही देवांच्या मंदिरावरूनच पुढे महाबळेश्वरवाडी हे नाव रुढ झाले. महाबळेश्वरवाडी हे महाबळेश्वरप्रमाणेच निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील तलावामुळे हजारो एकर शेती पाण्याखाली आली आहे. तसेच चार गावांच्या पाणीपुरवठा योजना येथील तलावावर चालतात. येथील अनेक सुपुत्रांनी पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. तसेच आजही अनेकजण सैन्यात कार्यरत आहेत.
महाबळेश्वरप्रमाणेच हे गाव उंचावर वसलेली आहे. या गावातील अनेकजण सैन्यात कार्यरत होते व आहेत. पहिल्या महायुद्धात मालोजी तुकाराम कोरेडे सहभागी झाले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात धोंडिराम सखाराम घोरपडे, मारुती सखाराम घोरपडे हे दोघे बंधू सहभागी होते. त्यांच्याबरोबरच ज्ञानू सावळाराम जगताप, कृष्णा महादू काटकर, कुंडला कृष्णा जेडगे, सुदाम बापू पुकळे, पांडुरंग दादू जेडगे यांचाही सहभाग होता. १९६२ मध्ये चिनबरोबर आपले युद्ध झाले. त्यामध्ये बाबासाहेब मालोजी कोरडे यांनी सहभाग घेतला होता. १९६५ आणि १९७१ मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात बाबासाहेब लहू निंबाळकर आणि प्रभाकर मारुती निंबाळकर यांनी चिनी सैन्याचा मुकबला केला होता. अशा प्रकारे एकूण २६ जणांनी देशाची सेवा केली आहे. आजही या गावातील अनेकजण देशसेवेत कार्यरत आहेत. महाबळेश्वरवाडी गावातील बाळासाहेब कुंडलिक जगताप हे श्रीलंका येथे शांतीसेनेतून गेले होते. त्यानंतर कारगिल युद्धातही त्यांनी मोलाचा सहभाग घेतला होता. याशिवाय कॅप्टन महादेव जगन्नाथ निंबाळकर आणि सुभेदार मेजर उत्तम चंद्रू पुकळे या सारख्या जवानांनी उच्चपदावर काम केले आहे.


ब्रिटिश सरकारचा ‘जंगी ईनाम’
महाबळेश्वरवाडीच्या गजीढोल पथकाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. कुरुंदवाडी येथील यात्रेतील स्पर्धेत महाबळेश्वरवाडीच्या पथकाने ‘सोन्याचं कडं’ जिंकून आणले होते, असे सांगण्यात येते. याच गावातील मालोजी कोरडे यांना ब्रिटिश सरकारतर्फे ‘जंगी ईनाम’ म्हणून महिना पाच रुपये त्यांच्या तीन पिढ्यांकरिता जाहीर झाला होता. महाबळेश्वरवाडीचा हा स्वाभिमान आहे, असे येथील जवान छातीठोकपणे सांगतात.


सत्तर जण गलई व्यवसायात...
येथील अनेकजण सैन्यात आहेत. तसेच सुमारे सत्तर जण गलई (आटणी) व्यवसायात आहेत. देशभर ते विखुरले आहेत. पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात ते सोने-चांदीचा व्यवसाय करीत आहेत.

Web Title: Name of Mahabaleshwarwadi from the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.