महसुली गावाचं नाव पडलं ‘म्हासोली’!
By admin | Published: March 29, 2015 12:41 AM2015-03-29T00:41:50+5:302015-03-29T00:42:52+5:30
१६०० चा कालखंड : उंडाळे विभागातील ५२ गावांचा महसूल एकाच गावाच्या चावडीत
लिंगनूर : त्राटिकेचे सोंग काढणारे महाराष्ट्रातील एकमेव गाव म्हणून परिचित असणाऱ्या बेडग (ता. मिरज) येथे मरगाई देवीची यात्रा तीन दिवस उत्साहात पार पडली. विविध कार्यक्रमांसाठी चार दिवसांत सुमारे लाखभर भाविकांनी उपस्थिती लावली.
बेडगच्या मरगाईदेवीच्या यात्रेस दरवर्षी गुढीपाडव्याच्या पाचव्या किंवा सातव्या दिवशी प्रारंभ होतो. पाडव्यापासून गावातील पिठाची गिरणी व कांडप यंत्रे यात्रा होईपर्यंत बंद करण्याची पद्धत आहे. यंदा यात्रेस गुरुवार, दि. २६ मार्चपासून प्रारंभ झाला. शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. पहिल्यादिवशी दंडवत, दुसऱ्यादिवशी अंबील शिंपणे, तर तिसऱ्यादिवशी पालखी उत्सव असा कार्यक्रम असतो. पहिल्यादिवशी धनगरी ओव्या व त्यानंतर सलग दोन दिवस कलापथकांचे मनोरंजनात्मक कार्यक्रमही पार पडले. रविवारीही लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे.
मुख्य दिवशी त्राटिकेचे सोंग काढण्यात येते. त्याला रामायणातील आख्यायिकेचा संदर्भ आहे. महाराष्ट्रात बेडग या एकमेव गावात त्राटिकेचे सोंग काढण्यात येते. शुक्रवारी रात्री नऊ वाजता या सोंगांना प्रारंभ झाला. रात्री बारापर्यंत सोंगांना पाहण्यास भाविक व स्थानिकांनी गर्दी केली होती.
परराज्यात गेलेल्या मूळ निवासी बेडगकरांसोबतच माहेरवाशीण महिला न चुकता यात्रेसाठी येतात. यात्रेनिमित्त विविध दुकाने, मिठाई, खेळणी, शीतपेये, विविध आकारातील पाळणे यांची रेलचेल होती. यात्रेदरम्यान ग्रामपंचायत व यात्रा समितीने मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. (वार्ताहर)
सोंगांची वैशिष्ट्ये
सुमारे सहा फू ट उंच लाकडी पट्टीवर सोंगांना उभे करण्यात येते. त्राटिकेचे सोंग काढणारी व्यक्ती काठीच्या आधाराने चालते. अतिशय कौशल्याने केवळ दोन उभ्या लाकडी पट्ट्यांवर चालावे लागते. यंदा सोंगांची उंची सुमारे १५ फूट होती. पूर्वी त्राटिकेचे सोंग १७ फुटापर्यंत उंच असे, पण विद्युत तारांचे अडथळे लक्षात घेऊन उंची कमी करण्यात आली आहे. त्राटिकेचे सोंग घेणाऱ्याला पारंपरिक पद्धतीने सजवले जाते. सजावटीचे साहित्यच सुमारे ५५ किलोचे असते. त्यात मुखवटा, साडी, मोरपिसे, दागिने यांचा समावेश असतो. त्राटिकेच्या सोंगासोबतच सेनापती, प्रधानजी, काळेसूर, बलिचर, सरस्वतीचे दोन घोडेस्वार या पात्रांचाही समावेश असतो.