सह्याद्रीच्या कड्यांना वीरांची नावे शासनाच्या इच्छेवर-.
By Admin | Published: December 18, 2014 10:12 PM2014-12-18T22:12:54+5:302014-12-19T00:25:20+5:30
..गर्जा महाराष्ट्र माझा
सातारा/महाबळेश्वर : छत्रपती शिवरायांच्या फौज फाट्यात सातारा जिल्ह्यातील अनेक पराक्रमी मावळ्यांचा सहभाग होता. सह्याद्रीच्या कड्यांना स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावलेल्या शूरवीरांची नावे द्यावीत, अशी मागणी जनतेतून होत आहे. मात्र नामांतराच्या प्रस्तावाचा प्रवास नगरपालिकेपासून शासनस्तरापर्यंत असणार आहे.
महाबळेश्वर नगर पालिकेच्या स्थापनेनंतर त्याचवेळी देण्यात आलेली पॉर्इंटची नावे आहे तशीच वनविभागाकडे देण्यात आली होती. महाबळेश्वर शहर आणि परिसरात २७ पॉर्इंट आहेत. हे सर्व पॉर्इंटची देखभाल विनविभागाकडून केली जाते.
महाबळेश्वर पॉर्इंटची नावे ब्रिटिशकालीन आहेत. इंग्रजाळलेल्या कड्यांना शूरवीरांची नावे देण्याबाबत मोहीम राबविली गेली आहे. त्याला जनतेतूनही प्रतिसाद मिळत आहे.
यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रियेसंदर्भात सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते म्हणाले, ‘येथील आॅर्थर सीट, बॉबिंग्टन, कॅनॉट पीक पॉर्इंट, एलफिस्टन, फॉक लॅण्ड पॉर्इंट, केट्स पॉर्इंट, लॉडविक पॉर्इंट, मुंबई पॉर्इंट, विल्सन पॉर्इंट या ठिकाणी पर्यटकांची गर्दी जास्त असते. त्यांची देखभाल वनविभागाकडून केली जाते. या पॉर्इंटची नावे वनविभागाकडे पालिकेकडून मिळाली आहेत. पॉर्इंटचे नामांतर करायचे असल्यास पालिका तसेच ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तो वन कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी अन् तेथून मंत्रालयात पाठवावा लागणार आहे.’ (प्रतिनिधी)