परजिल्ह्यातील व्यक्तींची लसीसाठी नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:41 AM2021-05-12T04:41:10+5:302021-05-12T04:41:10+5:30

फलटणमध्ये नगरपालिका शाळा व मुधोजी हायस्कूल येथे लसीचे डोस दिले जात आहेत. मागणीच्या प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने गोंधळ ...

Names of persons in the district for vaccination | परजिल्ह्यातील व्यक्तींची लसीसाठी नावे

परजिल्ह्यातील व्यक्तींची लसीसाठी नावे

Next

फलटणमध्ये नगरपालिका शाळा व मुधोजी हायस्कूल येथे लसीचे डोस दिले जात आहेत. मागणीच्या प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने गोंधळ वाढत आहे. दिवसाला शंभर किंवा दोनशे लसी मिळत असल्याने तासाभरातच लसीकरण संपवावे लागते. प्रशासन रजिस्ट्रेशन केलेल्यांची नावे जाहीर करत असले तरी लसीकरण केंद्रावर गर्दी वाढतच आहे. परजिल्ह्यातील अनेकांची नावे लसीकरण यादीत येत असल्याने वादावादीचे प्रकार घडू लागल्याने काही वेळेस लसीकरण बंद करावे लागत आहे. काहींचा दुसरा ढोस घेणे बाकी असून ४५ दिवस उलटूनही लस मिळत नसल्याने चुळबुळ वाढली आहे. लसी दोन प्रकारांच्या असल्या तरी काही वेळेस दोन्ही कंपन्यांची लसही मिळत नाहीत. लसीकरण केंद्रावर लांबच लांब रांगा लावून आणि दिवसभर थांबूनही लस मिळत नसल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Web Title: Names of persons in the district for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.