मतदार यादीत फोटो नसणार यांची नावे वगळली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:25 AM2021-07-09T04:25:01+5:302021-07-09T04:25:01+5:30
सातारा : निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार याद्यांमध्ये मतदारांचे फोटो देणे बंधनकारक केलेले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदारांचे फोटो घेण्याची मोहीम ...
सातारा : निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार याद्यांमध्ये मतदारांचे फोटो देणे बंधनकारक केलेले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदारांचे फोटो घेण्याची मोहीम जोरदार सुरू आहे. एकूण मतदारांपैकी ३८ हजार १४९ मतदारांनी अद्यापही मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे फोटो दिलेले नाहीत.
मतदार यादीमध्ये मतदारांचे फोटो आवश्यक आहेत. मागील काही निवडणुकांमध्ये मतदार यादीमध्ये फोटोच नसल्याने गोंधळ उडाला होता. मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांनी केंद्रप्रमुख यांनाच भेटीस धरण्याचा प्रकार जागोजागी घडला. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर मतदारांनी फोटो देण्याचे काम केले; परंतु अद्याप देखील बऱ्याच लोकांनी याबाबत गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदार नोंदणी तसेच ज्यांची पूर्वी नोंदणी झाले आहे अशा मतदारांची फोटो घेण्याचे काम सुरू ठेवले आहे. लोकांनी याबाबत गांभीर्याने घेणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना मतदानासाठीदेखील मुकावे लागणार आहे किंवा त्यांची नावे वगळली जाण्याची शक्यतादेखील आहे.
जिल्ह्यातील एकूण मतदार
२५ लाख ५७ हजार ४०६
स्त्री मतदार : १२ लाख ५१ हजार २१५
पुरुष मतदार : १३ लाख ६ हजार १३२
विधानसभानुसार छायाचित्र नसलेले मतदार
फलटण ७४७३
वाई १७५०
कोरेगाव १६४३
माण ५४६५
कऱ्हाड उत्तर ८६७
कऱ्हाड दक्षिण २३२७
पाटण ४५२७
सातारा १४०९७
एकूण ३८१४९
छायाचित्रे नसलेले मतदार
स्त्री १८४७२
पुरुष १९६७७
कोट
मतदार यादीमध्ये मतदाराचा फोटो असणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने याबाबतची कार्यवाही सुरू केलेली आहे. मतदारांनी गावामध्ये येणाऱ्या मतदान नोंदणी अधिकाऱ्याकडे स्वतःचा फोटो देणे आवश्यक आहे.
- नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक
छायाचित्र जमा न केल्यास मतदानाला मुकणार
मतदार यादीमध्ये मतदाराचे नाव आणि छायाचित्र असणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. याची मुदत जून अखेरपर्यंत होती. सध्या तरी प्रशासन सहकार्य करत आहे त्यानंतर मात्र वेळ देऊनदेखील मतदारांनी जरा गांभीर्याने घेतले नाही तर मतदानाला मुकू शकतात.
येथे जमा करा छायाचित्र
मतदारांना तालुक्याचे तहसील कार्यालय अथवा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे आपले छायाचित्र जमा करता येईल. जिल्हा प्रशासनाच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून याबाबत वारंवार आवाहन करण्यात येत आहे.