औंधच्या गजराजाचे किंग आॅफ एलिफंट नामकरण
By admin | Published: June 19, 2017 03:18 PM2017-06-19T15:18:47+5:302017-06-19T15:18:47+5:30
मथुरेत दाखल : वैद्यकीय तपासणी करून मोकळ्या वातावरणात वावर
औंधच्या गजराजाचे किंग आॅफ एलिफंट नामकरण
मथुरेत दाखल : वैद्यकीय तपासणी करून मोकळ्या वातावरणात वावर
आॅनलाईन लोकमत
औंध , दि. १९ : औंधवासियांच्या प्रेमाचे प्रतीक बनलेला गजराज उर्फ मोती शनिवारी मथुरा येथील वाईल्ड लाईफ एसओएस सेंटर येथे सुखरूप पोहोचला. तेथे त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्याठिकाणी फलक लावून त्याचे किंग आॅफ एलिफंट असे नामकरण करण्यात आले. दरम्यान, गजराजची वैद्यकीय तपासणी करून त्याला मोकळ्या वातावरणात सोडण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, गत बुधवारी औंधवासियांनी भारावलेल्या वातावरणात आपल्या लाडक्या गजराजाला हजारोंच्या उपस्थितीत निरोप दिला. गजराज औंधमध्येच रहावा अशी प्रत्येकाची इच्छा होती. मात्र, कायदेशीर अडचणींमुळे प्रशासनास कार्यवाही करून गजराजला मथुरेस पाठवावे लागले. त्याआधी तीन तास वाईल्ड लाईफच्या व्हॅनमध्ये बसण्यास गजराज तयार नव्हता. त्यानंतर मात्र खुल्या ट्रकमधून त्याला सातारा येथे आणण्या आले. त्यानंतर वाईल्ड लाईफ एसओएस व्हॅनमधून गजराजाची पुणेमार्गे मथुरेकडे रवानगी करण्यात आली. चार दिवसांच्या प्रवासानंतर गजराज मथुरेस पोहोचला. तेथे फलक लावून त्याचे किंग आॅफ एलिफंट असे संबोधन करून स्वागत करण्यात आले. भविष्यात त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, आपला गजराज सुखरूप पोहोचल्याची चर्चा औंधवासियांमध्ये सुरू असून हा गजराज लवकरात लवकर तंदुरूस्त व्हावा, शअी अपेक्षा प्रत्येकजण व्यक्त करत आहे. दहा जणांचे पथक त्यासाठ प्रवासा दरम्यान तैनात ठेवण्यात आले होते. शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजता मथुरा येथील वाईल्ड लाईफच्या एलिफंट केअर सेंटरच्या मैदानात गजराजाने पहिले पाऊल टाकले. त्यानंतर सोंडेने गवत, माती उडवून आपले वेगळेपण सिध्द केले.
चार दिवसाच्या प्रवासात फलाहार !
चार दिवसांच्या सुमारे दीड हजार किलोमिटर प्रवासामध्ये गजराजास कलिंगड, केळी, आंबा, मका व अन्य विविध प्रकारचे खाद्य पदार्थ गजराजला देण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी व त्याच्या शरीरावरील जखमांवर उपचार करण्यात आले. वाढत्या तापमानामुळे त्याला थंड पाण्याने आंघोळही घालण्यात आली. सातारा : औंधवासियांच्या प्रेमाचे प्रतीक बनलेला गजराज उर्फ मोती शनिवारी मथुरा येथील वाईल्ड लाईफ एसओएस सेंटर येथे सुखरूप पोहोचला. तेथे त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्याठिकाणी फलक लावून त्याचे किंग आॅफ एलिफंट असे नामकरण करण्यात आले. दरम्यान, गजराजची वैद्यकीय तपासणी करून त्याला मोकळ्या वातावरणात सोडण्यात आले.