पोलीस उपनिरीक्षकपदी नंदकुमार पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:37 AM2021-04-25T04:37:56+5:302021-04-25T04:37:56+5:30
तांबवे : येथील नंदकुमार आण्णासाहेब पाटील यांची केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन अंतर्गत दिल्ली पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली ...
तांबवे : येथील नंदकुमार आण्णासाहेब पाटील यांची केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन अंतर्गत दिल्ली पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. पोलीस अधिकारी होण्याची जिद्द असलेल्या नंदकुमार यांनी कोणत्याही खासगी शिकवणीविना हे यश मिळविले. देशाच्या राजधानीत तांबवेचा झेंडा रोवला आहे.
स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून महाराष्ट्रात तांबवेची ओळख आहे. तेथे घरटी स्वातंत्र्य सैनिक होते. त्या काळी गावाने स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. या स्वातंत्र्य सैनिकांच्या पंढरीत वाढलेला नंदकुमार पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत असलेल्या परीक्षेत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षपदी आपले नाव कोरले आहे. या परीक्षेसाठी देशभरातून आठ लाख विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये एक हजार सहाशे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये देशात ७१वा क्रमांक पटकावून नंदकुमार यशस्वी झाले आहेत.
नंदकुमार पाटील म्हणाले, ‘केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे. त्या अंतर्गत सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ही परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. यावेळी देशातून आठ लाख मुलांमध्ये माझा ७१वा क्रमांक आला आहे. हे माझ्यासाठी मोठे यश आहे. तरुणांनी कोणतेही काम, अभ्यास मन लावून केला की यश हे मिळतेच. त्यासाठी ध्येय ठरवून अभ्यास करावा.’
फोटो दिपक पवार यांनी मेल केला आहे.