नांदोशी पूल बनलाय मृत्यूचा सापळा, अनेकजण जायबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 04:47 PM2019-09-05T16:47:29+5:302019-09-05T16:51:11+5:30
औंध ते सातारा रहदारीच्या रस्त्यावरील नांदोशी पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या दुरवस्थेमुळे अनेकांनी आपले प्राण गमवाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून पुलाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई के ली नसल्याने हा पूल मृत्यूचा सापळा बनलाय. नांदोशी पुलाच्या कामास केव्हा मुहूर्त लागणार? असा प्रश्न स्थानिकांसह वाहनधारकांना पडला आहे.
औंध : औंध ते सातारा रहदारीच्या रस्त्यावरील नांदोशी पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या दुरवस्थेमुळे अनेकांनी आपले प्राण गमवाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून पुलाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई के ली नसल्याने हा पूल मृत्यूचा सापळा बनलाय. नांदोशी पुलाच्या कामास केव्हा मुहूर्त लागणार? असा प्रश्न स्थानिकांसह वाहनधारकांना पडला आहे.
रहदारीचा व वाहतुकीसाठी प्रमुख असणारा हा नांदोशी पूल औंध ते सातारा, कºहाड, सांगली, विटा या मार्गावरील वाहतुकीसाठी घाटमाथा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून नांदोशी येथील पूल प्रचंड रहदारी व वाहतुकीमुळे दोन्ही बाजूंनी खचला आहे. या पुलाची दगडे निसटू लागली आहेत. तसेच या पुलाला झाडाझुडपांचा विळखा बसला आहे. मागील पाच वर्षांत अपघातामुळे सुमारे सात ते आठजणांनी आपले प्राण गमवाले आहेत. तर शेकडोजण जायबंदी झाले आहेत.
हा पूल म्हणजे मृत्यूचा सापळा असून, या पुलांवरून येणारी वाहने ही सुसाट येतात. याठिकाणी दोन्ही बाजूला टाकलेले स्पीडब्रेकर ही आता अवजड व सततच्या वाहतुकीमुळे खराब झाले आहेत. त्यामुळे पुन्हा हे क्षेत्र अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. नांदोशीसह या मार्गावरील आणखी दोन छोटे पूल ही डबघाईला आले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या मार्गावरील पुलांचे रुंदीकरण करून उंची वाढवावी व वाहतुकीसाठी हा मार्ग सुलभ करावा. तसेच या मार्गावरील अन्य छोटे पूल ही नादुरुस्त झाले आहेत.
औंध भागातील औंध ते फलटण, औंध ते कुरोली, वडूज, औंध ते गोपूज रस्त्याची कामे सुरू आहेत. तसेच या रस्त्यांंचा दर्जा ही बदलला आहे. मात्र, औंध ते घाटमाथा या प्रमुख रहदारीच्या पाच किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण व पुलाच्या दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी केली जात आहे.
सगळीकडे रस्त्याची, पुलाची कामे सुरू आहेत. अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतलेल्या या पुलाचे काम नेमके कशात अडकले आहे. याचा शोध घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने लोकांचा अंत पाहू नये. काम लवकरात लवकर सुरू करावे.
- नवल थोरात