नरेंद्र पाटील यांच्याकडे पुन्हा अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 03:48 PM2019-12-21T15:48:31+5:302019-12-21T15:51:02+5:30
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा त्यांना अध्यक्षपद बहाल केले आहे.
सातारा : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा त्यांना अध्यक्षपद बहाल केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाटील यांनी नागपूर येथे भेट घेऊन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत शासनाच्या विविध योजनांद्वारे राज्यातील युवक उद्योजक होण्यासाठी केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला.
राज्य शासनाने विविध महामंडळे बरखास्त केल्याचे जाहीर केल्याने नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दि. १२ डिसेंबर रोजी सादर केला होता.
नागपूर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नरेंद्र पाटील यांनी भेट घेऊन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्याचा अहवाल त्यांच्याकडे सादर केला. कार्याचा अहवाल स्वीकारून ठाकरे यांनी नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा केली. या महामंडळाच्या अध्यक्षपदाची पुन्हा नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविणार असल्याबद्दल सूचित केले.