आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटलांची पुन्हा निवड!

By प्रमोद सुकरे | Published: October 17, 2022 05:34 PM2022-10-17T17:34:50+5:302022-10-17T17:35:06+5:30

मराठा समाजातील मुलांना व्यावसायिक कर्ज मिळावे, यासाठी नरेंद्र पाटील यांचे मोठे योगदान आहे.

Narendra Patil re-elected as President of Annasaheb Patil Mahamandal | आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटलांची पुन्हा निवड!

आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटलांची पुन्हा निवड!

googlenewsNext

प्रमोद सुकरे

कराड : पाटण तालुक्याचे सुपुत्र ,माथाडी काममगारांचे नेते, माजी आमदार नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांची अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा  नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र आज शासनाने काढले आहे.त्यांच्या या निवडीने कराड पाटण तालुक्यातील समर्थकांनी फटाक्यांची आतीषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.

मराठा समाजातील मुलांना व्यावसायिक कर्ज मिळावे, यासाठी नरेंद्र पाटील यांचे मोठे योगदान आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर हे पद रिक्त होते. आता भाजप- शिंदे सरकारने आज पुन्हा नियुक्ती केल्याचे जाहीर केले. 


पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील असलेले नरेंद्र पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी नेहमीच जवळीक राहिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरही नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणावरून परखड भूमिका घेतली होती. मराठा समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर अनेकदा टीकाही केली. तसेच त्यांना पदावरून हटविण्याचीही मागणी केली. या मागणीनंतर अवघ्या आठवडाभरात नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. 

माजी आमदार नरेंद्र पाटील याच्या काळात महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तरूणांना व्यावसायिक कर्जे देण्यात आली. तसेच मराठा समाजाच्या अडी- अडचणी समजून घेण्यासाठी अनेक दाैरेही केले होते. त्यांनी केलेल्या कामामुळे शेकडो युवकांना रोजगार मिळाले होते. परंतु त्यांना पदावरून हटविल्यानंतर महामंडळाच्या काम ठप्प झाले होते. आज नरेंद्र पाटील यांच्या निवडीनंतर कराड- पाटण येथील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Web Title: Narendra Patil re-elected as President of Annasaheb Patil Mahamandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.