'मी देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा कट्टर कार्यकर्ता'; माथाडी कामकार नरेंद्र पाटील यांचे भाजपत जाण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 03:08 PM2021-03-24T15:08:17+5:302021-03-24T15:09:26+5:30

मुंबईत माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माथाडीच्या प्रश्‍नांबाबत वर्षा किंवा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घ्यावी, अशी विनंती आपण केली होती. पण ते झाले नाही.

Narendra Patil Says there is no time at Chief Minister Uddhav Thackeray and give Signals to leave Shiv Sena | 'मी देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा कट्टर कार्यकर्ता'; माथाडी कामकार नरेंद्र पाटील यांचे भाजपत जाण्याचे संकेत

'मी देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा कट्टर कार्यकर्ता'; माथाडी कामकार नरेंद्र पाटील यांचे भाजपत जाण्याचे संकेत

Next

सातारा : माथाडींच्या प्रश्नांबाबत वेळोवेळी मागणी करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नांबाबत आपलेपणाने चौकशी केली नाही किंवा बैठकदेखील लावली नाही. आता मी कोणाला भेटतो, कोणाशी बोलतो, याबाबतदेखील शिवसैनिक लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे आता इथून पुढच्या काळात शिवसेनेत काम करणे जमणार नाही. पक्षातून बाहेर पडलेले बरे, असे म्हणत माथाडी नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी मंगळवारी शिवसेना सोडण्याची घोषणा केली. (Narendra Patil Says there is no time at Chief Minister Uddhav Thackeray and give Signals to leave Shiv Sena.)

मुंबईत माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माथाडीच्या प्रश्‍नांबाबत वर्षा किंवा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घ्यावी, अशी विनंती आपण केली होती. पण ते झाले नाही. त्यानंतर पुढच्या काळात मुख्यमंत्र्यांनी मला एपीएमसी मार्केट सुरू करा, असे फोन करून सांगितले होते. त्यानुसार आम्ही त्यानंतर एपीएमसी मार्केट सुरू केले. नंतर माथाडी कामगारांच्या अत्यावश्यकमध्ये समावेश करून घ्यावा, असे सांगितले पण त्यांना वेळ भेटला नाही. माथाडींच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांनी कधीच वेळ दिला नाही. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे, ते मुख्यमंत्र्यांनी पार पाडले नाही.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी कधीही लक्ष दिले नाही. माथाडी चळवळ मोठी असून या चळवळीचे प्रश्न समजून घेऊन खालच्या मंत्र्यांना आदेश देणे गरजेचे होते. पण या प्रश्नासाठी त्यांनी कधी वेळच दिला नाही, असे सांगून नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या लोकांना माझ्यामुळे कमीपणा येत असेल, तर मी अलिप्त राहिलेले बरे, असे त्यांनी स्पष्ट करत शिवसेना सोडून भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले.

माथाडी चळवळ मोठी असून या चळवळीचे प्रश्न समजून घेऊन खालच्या मंत्र्यांना त्यांनी आदेश दिने गरजेचे होते, पण या प्रश्नासाठी त्यांनी कधीच वेळ दिला नाही. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्याकडे नाराजी आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले, की माझ्यावर शिवसेनेचे नरेंद्र पाटील अशी टीका होते. मी केवळ हिंदुत्वाच्या विचारावर शिवसेना गेलो, असेही पाटील म्हणाले.

उदयनराजे भोसले यांची अचानक महामार्गावर भेट झाल्यानंतर, शिवसेनेचे नरेंद्र पाटील असा उल्लेख आवर्जून केला जातो. त्यांना भेटतो हा माझा वैयक्तिक विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो हा माझा वैयक्तिक विषय आहे. याचा शिवसेनेशी काही संबंध नाही. शिवसेनेच्या लोकांना माझ्यामुळे का कमीपणा यावा? असा प्रश्न करून शिवसेनेच्या नेत्यांना मी जास्त मान देत नाही. माझे बोलणे केवळ एकनाथ शिंदे यांच्याशी होते. त्यामुळे मलाही वाटते आपण अलिप्त राहिलेले बरे. त्यांनाही टीका-टिप्पणी नको आणि सामान्य शिवसैनिकांना ही नाराजी नको. मी देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा कट्टर कार्यकर्ता आहे. काय करायचे काय नाही, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. इतरांना त्याबाबत प्रश्न पडण्याचे कारण नाही, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Narendra Patil Says there is no time at Chief Minister Uddhav Thackeray and give Signals to leave Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.